तरुण भारत

कर्नाटक : पीएम मोदींचा बोम्माईंना फोन, पूर परिस्थितीवर चर्चा

बेंगळूर : प्रतिनिधी

मंगळवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्याशी फोनवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील तसेच राजधानी बेंगळुरूमधील पूरस्थितीबद्दल विचारणा केली. गेल्या एक महिन्यापासून कर्नाटकातील अनेक भागांना विलक्षण मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे.
“माननीय पंतप्रधान नरेंद्र यांनी राज्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीवर माझ्याशी संवाद साधला. माननीय पंतप्रधानांनी जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला असून पिकाच्या नुकसानाबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली. पंतप्रधानांनी केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले,” बोम्माई यांनी ट्विट केले.

भारताची तंत्रज्ञान राजधानी मानल्या जाणार्‍या बेंगळूरमधील पूरग्रस्त निवासी भागांची छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत असल्याच्या एका दिवसानंतर पंतप्रधान मोदी आणि बोम्माई यांच्यातील टेलिफोन कॉल झाला.

Advertisements

Related Stories

जिल्हाधिकारीपदी पुन्हा एम.जी.हिरेमठ

Amit Kulkarni

इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या जिल्हा शाखेतर्फे रेडक्रॉस दिन साजरा

Amit Kulkarni

शहराच्या मध्यवर्ती भागात पाणीटंचाईची समस्या

Amit Kulkarni

राज्यात शनिवारी ४९० कोरोनाबाधितांची भर

Abhijeet Shinde

आम्हाला तातडीने वेतन व भत्ता द्या

Patil_p

परिवहन तोटय़ात …बससेवा सुरूच

Patil_p
error: Content is protected !!