तरुण भारत

एसटी कर्मचाऱ्यांना अडवू नका; कर्मचाऱी संघटनांना उच्च न्यायालयाचे निर्देश

ऑनलाईन टीम/ तरुण भारत

कामावर रूजू होऊ इच्छिणाऱ्या एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांना अडवण्यात येत असल्याचे निदर्शनास आणल्यानंतर, असे केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मुभा महामंडळ आणि पोलिसांना असेल, असा इशारा उच्च न्यायालयाने सोमवारी दिला.

एसटी चालक आणि वाहकांना कामावर रूजू होण्यापासून कोणीही अडवू नये. संघटनांच्या सदस्यांनी हिंसक मार्गाचा अवलंब करू नये. या आदेशांचे उल्लंघन केल्यास संबंधितांविरुद्ध पोलिसांत तक्रार नोंदविण्याची एसटी महामंडळाला, तर तक्रारीची दखल घेऊन आवश्यक ती कारवाई करण्याची पोलिसांना मुभा असेल, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

Advertisements

Related Stories

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या हाती शिवबंधन!

Rohan_P

अंबानी नव्हे, तर ‘हा’ आहे आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती

Abhijeet Shinde

के.के. वेणुगोपाल यांचा कार्यकाळ वाढला

Patil_p

‘गेल’ संचालकांना लाचप्रकरणी अटक

Patil_p

सातारा : जिल्ह्यात १७४ बाधित; ८ जणांचा मृत्यू

Abhijeet Shinde

सचिन वाझे मुंबई पोलीस दलातून बडतर्फ

Rohan_P
error: Content is protected !!