तरुण भारत

नोव्हेंबरमध्ये आतापर्यंत निर्यातीत 18 टक्के वाढ

वाढीसोबत 20.01 अब्ज डॉलरच्या घरात

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

देशाची निर्यात ही नोव्हेंबर महिन्यात आतापर्यंत 18.8 टक्क्यांनी वधारुन 20.01 अब्ज डॉलरच्या घरात पोहोचली आहे, अशी माहिती वाणिज्य मंत्रालयाकडून सादर केलेल्या आकडेवारीतून सांगितली आहे. वाणिज्य मंत्रालयाकडून 1 ते 21 नोव्हेंबरपर्यंतचे आकडे सादर केले असून यातील निर्यातीमध्ये साधारणपणे पेट्रोलियम उत्पादने, इंजिनिअरिंग साहित्य, रसायन तसेच रत्न व आभूषणे यांचा समावेश राहिला आहे. या क्षेत्रांच्या माध्यमातून चांगली कामगिरी करत निर्यात वाढीला मोठी मदत झाली असल्याची माहिती आहे.

साधारणपणे नोव्हेंबरच्या अगोदर तीन आठवडय़ात आयातही 45.34 टक्क्यांनी वधारुन 35.11 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. मागील वर्षात साहित्यामध्ये हा आकडा 24.15 अब्ज डॉलर राहिला होता.

चालू आर्थिक वर्षातील निर्यात वृद्धीची स्थिती योग्य असून 400 अब्ज डॉलरच्या निर्यातीचे ध्येय प्राप्त करण्याचे निश्चित केले असल्याची माहिती आहे. ऑक्टोबरमध्ये निर्यात 43 टक्क्यांनी वधारुन 35.65 अब्ज डॉलरवर पोहोचली होती.

प्रमुख क्षेत्रांचा समावेश

निर्यातीमधील कामगिरी केलेल्या उत्पादनांमध्ये पेट्रोलियम, कॉफी, इंजिनिअरिंग साहित्य, सूती धागे, रत्न आणि आभूषण, रसायन, प्लास्टिक यांचा समावेश होता.

Related Stories

आरजीपीएलमधील गेलची हिस्सेदारी एनटीपीसी घेणार

Patil_p

टाटा मोटर्सकडून 21 नवीन व्यावसायिक वाहनांचे अनावरण

Patil_p

हॉलमार्कविना दागिने विकण्यासाठी मिळाला वाढीव कालावधी

Patil_p

ई-श्रम पोर्टलवर सदस्यांची संख्या 15 कोटीवर

Patil_p

परफ्यूम-पेय पदार्थ कंपन्या आता हॅन्ड सॅनिटायजरच्या व्यापारात

tarunbharat

शेअर बाजारात पुन्हा घसरणीची नोंद

Patil_p
error: Content is protected !!