तरुण भारत

दुसऱया सत्रात सेन्सेक्स सावरला

घसरणीनंतर बाजारात दिलासा – सेन्सेक्स 198 अंकांनी तेजीत

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisements

भारतीय भांडवली बाजारात चालू आठवडय़ातील पहिल्या दिवशी सोमवारी मोठय़ा प्रमाणात बीएसई सेन्सेक्सची पडझड झाल्याचे पहावयास मिळाले होते. परंतु दुसऱया दिवशी मंगळवारी मात्र काही प्रमाणात घसरणीतून सावरत सेन्सेक्स 198 अंकांच्या तेजीसोबत बंद झाला आहे.

यामध्ये प्रामुख्याने वीज, दूरसंचार आणि औषध कंपन्यांचे समभाग लाभात राहिले असून याचा फायदा सेन्सेक्सला झाला असल्याचे अभ्यासकांकडून सांगितले जात आहे. मंगळवारच्या सत्रात प्रारंभीच्या काळात बीएसईमधील प्रमुख 30 समभागात सेन्सेक्स जवळपास 700 अंकांनी प्रभावीत राहिला होता. त्यानंतर काहीसा बाजार सावरत आपली नुकसान भरपाई करत अंतिम क्षणी सेन्सेक्स 198.44 अंकांसोबत वधारुन 58,664.33 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी 86.80 अंकांनी वाढत 17,503.35 वर पोहोचला आहे. दिग्गज कंपन्यांमध्ये पॉवरग्रिडचे समभाग जवळपास चार टक्क्यांनी वधारले असून अन्य कंपन्यांमध्ये एनटीपीसी, टाटा स्टील, भारती एअरटेल, सन फार्मा आणि बजाज फिनसर्व्ह यांचे समभाग लाभात राहिले असून अन्य कंपन्यांमध्ये इंडसइंड बँक, एशियन पेन्ट्स, इन्फोसिस, बजाज ऑटो आणि मारुती सुझुकीचे समभाग 2.59 टक्क्यांनी घसरुन बंद झाले आहेत.

अन्य बाजारातील स्थिती

आशियातील विविध बाजारांपैकी, हाँगकाँगचा हँगसेंग आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी नुकसानीत राहिला होता. चीनचा शांघाय कम्पोझिट आणि जपानचा निक्की हा मात्र लाभात राहिला असल्याचे पहावयास मिळाले. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 1.02 टक्क्यांच्या घसरणीसोबत 78.89 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले होते.

तज्ञांच्या नजरेतून

बाजारातील कामगिरीचा आढावा हा तज्ञांच्या नजरेतून पाहिल्यास त्यामध्ये दिवसभरातील कामगिरीत प्रमुख क्षेत्रांमध्ये धातू, सरकारी बँक आणि औषध कंपन्यांच्या समभागांच्या मजबूतीमुळे सेन्सेक्स घसरणीमधून सावरला असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.

Related Stories

किया मोटर्सकडून भारतात 1 लाख वाहनांची विक्री

Patil_p

वाहन नोंदणीत ऑगस्टमध्ये 15 टक्क्यांची वाढ

Amit Kulkarni

जूनमध्ये 16,662 कंपन्यांची नोंदणी

Patil_p

सॅमसंग गॅलक्सी नोट 10 दरात घट

Patil_p

सोनीचा अनोखा बेव्हीया टीव्ही बाजारात

Patil_p

विमान प्रवाशांचा तिकीट रक्कम मिळण्यासाठी तगादा

Amit Kulkarni
error: Content is protected !!