तरुण भारत

पीव्ही सिंधू ऍथलिट्स कमिशनची निवडणूक लढवणार

क्वालालंपूर / वृत्तसंस्था

दोनवेळची ऑलिम्पिक पदकविजेती आणि स्टार भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू बॅडमिंटन वर्ल्ड ऍथलिट्स कमिशनची निवडणूक लढणार आहे. दि. 17 डिसेंबर रोजी ही निवडणूक होत आहे.

Advertisements

सिंधूचा यापूर्वी देखील या ऍथलिट्स कमिशनमध्ये समावेश होता. यंदा पुन्हा निवडणूक रिंगणात उतरणारी ती एकमेव विद्यमान सदस्य आहे. पीव्ही सिंधूची सर्वप्रथम 2017 मध्ये ऍथलिट्स कमिशनवर निवड झाली होती.

यंदा 6 जागांसाठी 9 जण रिंगणात आहेत. निवडल्या गेलेल्या सदस्यांमधून ऍथलिट्स कमिशनच्या नव्या अध्यक्षाची निवड केली जाते. शिवाय, अध्यक्षपदी विराजमान व्यक्तीचा जागतिक बॅडमिंटन संघटनेत कौन्सिल सदस्य म्हणून समावेश  केला जातो.

Related Stories

नदाल, सित्सिपस, प्लिस्कोव्हा, कॅनेपी तिसऱया फेरीत

Amit Kulkarni

राफेल नदाल उर्वरित हंगामातून बाहेर

Patil_p

शिखर धवनच्या 10 हजार धावा

Patil_p

आयसीसीच्या स्पर्धा भरविण्यासाठी १७ देश उत्सुक

Patil_p

पाकचा सातवा क्रिकेटपटू कोरोनाबाधित

Patil_p

विश्व ट्रायथ्लॉन चॅम्पियनशिप रद्द

Patil_p
error: Content is protected !!