तरुण भारत

मोदींच्या सभेला काळं मास्क, टोपी आणि कपडे घालून जाण्यास बंदी

ऑनलाईन टीम/तरुण भारत

पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ नोव्हेंबर रोजी नोएडामधील गौतमबुद्ध नगर येथे जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी मोठी तयारी केली आहे. या कार्यक्रमास मोदींबरोबर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित राहणार आहेत. यावेळी कार्यक्रमाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आलेत. कार्यक्रमावेळी सभेसाठी येणाऱ्या व्यक्तींनी कोणत्या पद्धतीने कपडे घालू नये हे सुद्धा सांगण्यात आलं आहे. पंतप्रधानांच्या या कार्यक्रमाला काळं मास्क, काळे कपडे किंवा काळी टोपी घालून जाण्यास बंदी घालण्यात आलीय.

जेवर विमानतळाच्या भूमीपूजनानंतर पंतप्रधान मोदी जेवरमध्ये एका सभेला संबोधित करणार आहेत. यासाठी नियमावली जारी केली आहे. अधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार या सभेसाठी कोणत्याही व्यक्तीला काळं मास्क, काळी टोपी आणि काळे कपडे घालून प्रवेश दिला जाणार नाही. जेवर जिल्ह्यामधील काही स्थानिकांचा या विमानतळाला विरोध आहे. त्यामुळेच हे लोक या कार्यक्रमामध्ये काळा कपडा दाखवून विरोध दर्शवण्याची आणि गोंधळ घालण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते, असं आज तकने दिलेल्या वृत्तात म्हटलंय. काही स्थानिकांनी विमानतळाचं नाव सम्राट मिहिर भोज असं ठेवण्यात यावं अशी मागणी केलीय. स्थानिकांचा विरोध आणि या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर काळ्या कपड्यांवर बंदी घालण्यात आलीय.

Advertisements

Related Stories

कोरोनाचा तिसरा उद्रेक ‘आपल्या इच्छेवर’

Patil_p

ना‘पाक’ हल्ल्यात 3 जवानांना वीरमरण

Patil_p

कर्नाटकात आतापर्यंत २८ लाखाहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

Abhijeet Shinde

देशात अद्याप समूह संसर्ग नाही

tarunbharat

राजस्थानचे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात

Patil_p

केंद्र सरकारचे गरिबांकडे दुर्लक्ष

Patil_p
error: Content is protected !!