तरुण भारत

सावर्डेचे सरपंच प्रदीप माने यांचा सांगली जिल्हा न्यायालयाच्यावतीने गौरव

मणेराजूरी / वार्ताहर

सावर्डेचे सरपंच प्रदीप माने यांचा सांगली जिल्हा न्यायालयाच्या वतीने विशेष सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला. नुकताच सावर्डे शासकीय योजनाचा महामेळावा पार पडला. हा मेळावा व महाशिबिराचे नेटके नियोजन करून पार पाडल्याबद्दल जिल्हा न्यायालयाने लोकनियुक्त सरपंच प्रदीप माने व त्यांच्या सर्व सहकारी ग्रामस्थांप्रती सद्भावना ‌ व्यक्त करून आभार मानले.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली आणि जिल्हाधिकारी कार्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने जागरूकता व संपर्क अभियान अंतर्गत विधिसेवा महाशिबीर आणि शासकीय योजनांचा महामेळावा सावर्डे येथे उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माननीय अभय अहुजा साहेब व पालकमंत्री न्यायमूर्ती संदीप शिंदे ‘ जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी ; व जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षित गेडाम ; यांच्या उपस्थितीत यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल सांगली जिल्हा न्यायालयाच्या वतीने सन्मानपत्र देऊन सरपंच प्रदीप माने पाटील यांचा गौरव करण्यात आला.

Advertisements

यावेळी जिल्हा प्रमुख तथा सत्र न्यायाधीश मा. विजय पाटील साहेब म्हणाले सावर्डे गावचे काम उल्लेखनीय असल्यामुळे निवड समितीने सावर्डे गावची निवड केली व कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला याबाबत उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय आहुजा साहेब व पालक न्यायमूर्ती संदीप शिंदे साहेब यांनी कार्यक्रमाचे कौतुक करून धन्यवाद दिलेलं आवर्जून सांगितले ,निश्चितच जिल्ह्यासाठी हे अभिमानास्पद आहे , यावेळी सरपंच प्रदीप माने यांचेही कौतुक करून शाबासकीची थाप दिली. न्यायालयाच्यावतीने सन्मानपत्र देऊन सरपंचाचा गौरव करण्यात आला. या गौरवाबद्दल सरपंच प्रदीप माने पाटील म्हणाले हा सन्मान केवळ माझा नसून सावर्डे गावचा व तासगाव तालुक्याचा आहे .न्यायालयाने दिलेल्या शाबासकी मुळे माझ्यातील आत्मविश्वास निश्चितच द्विगुणित झालेला आहे. यापुढेही आदर्शवत काम करत राहू. असे ही ते यावेळी म्हणाले.

Related Stories

भारत मदने बलभीम केसरीसह एक लाखाचा मानकरी

Sumit Tambekar

तासगांव – कवठेमहांकाळ महामार्गावर मणेराजूरी जवळ ट्रक उलटला

Sumit Tambekar

कडेगाव नगरपंचायतीसाठी ८१.४९ टक्के मतदान

Sumit Tambekar

मिरजेत बेकायदेशीर दारू विक्रीवर कारवाई, 23 हजारांची दारू जप्त

Sumit Tambekar

सांगली वसंत मार्केट यार्डमध्ये हमाल तोलाईदारांचे काम बंद ठीय्या आंदोलन

Sumit Tambekar

कृषी राज्यमंत्र्यांच्या तालुक्यात महावितरणने शेती पंपाच्या जोडण्या तोडल्या

Abhijeet Shinde
error: Content is protected !!