तरुण भारत

निलेश साबळेंनी मागितली राणेंची माफी

तरुण भारत ऑनलाईन टीम

चला हवा येऊ द्या हा लोकप्रिय कार्यक्रम नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो. पण सध्या तो वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. या मालिकेचे दिग्दर्शक आणि सूत्रसंचालक निलेश साबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नारायण राणे यांची भेट घेऊन माफी मागितली आहे.

Advertisements

दिवाळीच्या काळात चला हवा येऊ द्याच्या सेटवर दिवाळी अधिवेशन हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात काही राजकीय व्यक्तींची पात्रे दाखवली होती. त्यात राणे यांचे हुबेहुब पात्र दाखवण्यात आले होते. यावर राणे समर्थकांनी आक्षेप नोंदवत राणे यांचा अवमान झाल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला.त्यांनी सातत्याने वाहिनीला आणि साबळे यांना फोन करून माफीची मागणी केली होती. यामुळे साबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राणे यांची भेट घेत माफी मागितली आहे यावेळी नारायण राणे यांच्यासह त्यांचे पुत्र आणि आमदार नितेश राणे हे देखील उपस्थित होते. राणे यांच्या समर्थकांनी या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Related Stories

”आपण करायचे नाही, इतरांना करू द्यायचे नाही”

Abhijeet Shinde

सोलापूर ग्रामीणमध्ये १४७ कोरोनाबाधितांची भर; एकूण संख्या २१४१ वर

Abhijeet Shinde

महाराष्ट्रात 10 वीचा निकाल 31 जुलैपर्यंत, तर 12 वीचा 15 ते 20 जुलै दरम्यान

Rohan_P

सांगलीवाडीत नागरी वस्तीत शिरलेली अजस्त्र मगर पकडली

Abhijeet Shinde

ऑगस्टपर्यंत संसर्गाचे प्रमाण शून्यावर : डॉ. रोहिदास बोरसे

prashant_c

सोलापूर ग्रामीणमध्ये कोरोनाने नऊ जणांचा मृत्यू, 371 नवे पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde
error: Content is protected !!