तरुण भारत

इराणला अण्वस्त्रसज्ज होऊ देणार नाही!

इस्रायलच्या पंतप्रधानांचा निर्धार – जागतिक समुदायाशी इराणचा करार आमच्यासाठी निरर्थक

वृत्तसंस्था / जेरुसलेम

Advertisements

इस्रायल कुठल्याही स्थितीत इराणला आण्विकशक्ती होऊ देणार नसल्याचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी स्पष्ट केले आहे. बेनेट यांचे हे वक्तव्य एकप्रकारे अमेरिकेला संकेत देणारे आहे. अमेरिकेने इराणसोबत कुठल्याही प्रकारचा आण्विक करार केल्यास तो इस्रायलला मंजूर नसणार असे यातून स्पष्ट होते. बेनेट यांनी यावेळी माजी पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांच्यावर टीका केली. आमच्या देशाचे नेते 2015 मध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात आण्विक करार झाल्यावर एकप्रकारे झोप पूर्ण करण्यासाठी गेले होते असे उपरोधिक विधान बेनेट यांनी केले.

जूनमध्ये पंतप्रधान झालेले बेनेट यांना कट्टर ज्यू मानले जाते. एका कार्यक्रमात त्यांनी इराणच्या आण्विक कार्यक्रमाबद्दल पहिल्यांदाच अत्यंत कठोर भूमिका दर्शविली आहे. यावेळी त्यांनी अमेरिकेला थेट उल्लेख न करता इशारा दिला आहे.

जागतिक समुदायाने इराणसोबत त्याचा आण्विक कार्यक्रम रोखण्यासाठी एखादा करार केल्यास त्याला इस्रायल पाठिंबा देईलच असे नाही. 2015 मध्ये आमच्याकडून झालेल्या चुकीची आम्ही पुनरावृत्ती करणार नाही. इराण अण्वस्त्र निर्मितीच्या अत्यंत समीप पोहोचल्याचे इस्रायलचे मानणे असल्याचे बेनेट म्हणाले.

भूमिकेत बदल

पंतप्रधान झाल्यावर बेनेट यांनी इराणबद्दल कठोर भूमिका घेतली नव्हती. इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम रोखण्यासाठी एखादा करार झाल्यास इस्रायल साथ देणार असल्याचे त्यांनी यापूर्वी म्हटले होते. पण आता त्यांनी या भूमिकेत बदल केला आहे. तसेच यातून इराणसंबंधी अमेरिका आणि इस्रायल यांच्या भूमिकेत मतभेद निर्माण होत असल्याचे जाणवते. तेहरानमध्ये निवांत बसलेले लोक इस्रायलवर छोटे हल्ले घडवून आणत आहेत. ही पद्धत उपयुक्त ठरणार नाही. पण इराण आमच्या विचारापेक्षा अधिक धोकादायक असल्याचे बेनेट यांनी म्हटले आहे.

Related Stories

युएईत विदेशी पर्यटकांना प्रवेश मिळणार

Patil_p

इस्राईलमध्ये 27 डिसेंबरपासून लसीकरणाला सुरुवात

datta jadhav

आयर्लंडचे पंतप्रधान रुग्ण सेवेसाठी पुन्हा एकदा डॉक्टरी पेशात

prashant_c

कोरोना विषाणूला नाकातच रोखणार नेजल स्प्रे

Patil_p

प्रवाशांवर बंधन

Omkar B

ऑस्ट्रीयात कोरोनाविषयी खबरदारी अंशतः लॉकडाऊन जारी

Patil_p
error: Content is protected !!