तरुण भारत

इस्लामिक स्टेटकडून गौतम गंभीरला धमकी

दिल्ली पोलिसांकडून तपास सुरू – सुरक्षा वाढविण्यात आली

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

भारताचा माजी क्रिकेटपटू तसेच खासदार गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी देणारा ईमेल प्राप्त झाला आहे. पूर्व दिल्लीचे भाजप खासदार गंभीर क्रिकेटसह अनेक मुद्दय़ांवर स्वतःचे रोखठोक मत मांडण्यासाठी ओळखले जातात. ईमेलनंतर दिल्ली पोलिसांनी गंभीर यांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढविली आहे.

धमकीचा ईमेल ‘आयएसआयस काश्मीर’कडून प्राप्त झाला आहे. याप्रकरणी तपास केला जातोय. गंभीर यांनी दिल्ली पोलिसांना यासंबंधी माहिती दिली असल्याचे पोलीस उपायुक्त श्वेता चौहान यांनी सांगितले आहे.

क्रिकेटपटू ते राजकीय नेते असा प्रवास केलेले गंभीर प्रत्येक मुद्दय़ावर रोखठोक भूमिका मांडण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी अनेकदा दहशतवादाच्या विरोधात विधान केले आहे. 2011 चा विश्वचषक जिंकणाऱया क्रिकेट संघाचे गंभीर सदस्य होते. गौतम यांना मंगळवारी रात्री 9.32 वाजता हा धमकीचा ईमेल प्राप्त झाला होता. गौतम आणि त्यांच्या कुटुंबाला ठार करण्याची धमकी यातून देण्यात आली आहे. गौतम यांनी शनिवारी एक ट्विट करत काँग्रेस नेते नवज्योत सिंह सिद्धू यांचा थेट उल्लेख न करता त्यांच्यावर निशाणा साधला होता. “स्वतःच्या मुलाला किंवा मुलीला सीमेवर पाठवा आणि मग एका दहशतवादी देशाच्या प्रमुखाला स्वतःचा मोठा भाऊ म्हणा’ असे गौतम यांनी नमूद केले होते. कर्तारपूर येथे पोहोचल्यावर सिद्धू यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे आपले मोठे भाऊ असल्याचे म्हटले होते. याप्रकरणी भाजपने त्यांच्यावर जोरदार टीका केली होती.

Related Stories

कोरोना बळींच्या संख्येत भारत पाचव्या स्थानी

datta jadhav

मागील साडेचार वर्षात दिल्या 4.5 लाख तरुणांना नोकऱया

Patil_p

देशातील ‘या’ तीन राज्यात जाणवले भूकंपाचे धक्के!

Rohan_P

देशद्रोहाहून मोठा गुन्हा नाही!

Patil_p

कोरोना लसीकरणाचा वेग वाढणार

Amit Kulkarni

सहा जवानांना शौर्य चक्र पुरस्कार

Patil_p
error: Content is protected !!