तरुण भारत

पाकिस्तान कंगाल झाल्याची इम्रान यांची कबुली

वृत्तसंस्था/ इस्लामाबाद

पाकिस्तानला विदेशी कर्जापासून मुक्त करण्याचे आश्वासन देणारे पंतप्रधान इम्रान खान यांनी आपला देश कंगाल झाल्याचे अखेर मान्य केले आहे. पाकिस्तानकडे देश चालविण्यासाठी पैसाच नाही. याचमुळे पाकिस्तानला कर्ज घ्यावे लागतेय. ज्या घरात खर्च अधिक आणि उत्पन्न कमी असेल ते घर नेहमीच अडचणींमध्ये असते, अशीच काही स्थिती पाकिस्तानची झाली असल्याचे इम्रान यांनी म्हटले आहे.

Advertisements

खर्च अधिक असल्याने पाकिस्तान गुंतवणूक करू शकत नाही आणि यामुळे देशाचा विकास ठप्प झाला असल्याचे इम्रान म्हणाले. कर्ज घेऊन कर्ज फेडणाऱया कंगाल पाकिस्तानला आता विदेशी संस्थांकडून कर्ज देण्यास नकार दिला जातोय. आयएमएफने पाकिस्तानला एक अब्ज डॉलर्सचे कर्ज देण्यास नकार दिला आहे.

आयएमएफची मनधरणी करण्यासाठी इम्रान सरकारने वीज आणि पेट्रोल-डिझेलच दरांमध्ये मोठी वाढ केली, तरीही जागतिक संस्थेच्या शंका दूर करण्यास पाकिस्तानला यश आलेले नाही. आयएमएफकडून कर्ज न मिळाल्याने पंतप्रधान इम्रान खान आंता पुन्हा चीन किंवा आखाती देशांसमोर हात पसरावे लागू शकतात.

पाकिस्तान सरकारच्या याचनेनंतर आयएमएफने अर्थव्यवस्था वाचविण्यासाठी 6 अब्ज डॉलर्सचे कर्ज मंजूर केले होते. याच्या अंतर्गत एक पुढील हप्त्याच्या स्वरुपात एक अब्ज डॉलर्स दिले जाणार होते. पण पाकिस्तानकडून अटींचे पालन होत असल्याने आयएमएफने आता पुढील हप्ता देण्यास नकार दिला आहे.

प्रत्येक पाकिस्तानीवर कर्जाचा मोठा भार

विदेशी कर्ज न घेण्याचे आश्वासन देत सत्तेवर आलेले इम्रान खान सातत्याने कर्ज फेडण्यासाठी कर्जाची उचल करत आहेत. प्रत्येक पाकिस्तानीवर आता 1 लाख 75 हजार रुपयांचे कर्ज असल्याची कबुली सरकारने अलिकडेच संसदेत दिली आहे. यात इम्रान खान सरकारचे योगदान 54,901 रुपये इतके असून कर्जाच्या एकूण रकमेच्या हे प्रमाण 46 टक्के इतके आहे. कर्जाचा भार हा मागील दोन वर्षांमध्ये वाढला आहे.

Related Stories

चीनमधील भारतीय प्रजासत्ताकदिनाचा कार्यक्रम रद्द

prashant_c

हेलिकॉप्टर अपघातात अलास्कामध्ये 5 ठार

Patil_p

ब्रिटनची सम्राज्ञी-राजपुत्राची भेट

Patil_p

एक डोसच्या लसीद्वारेही अँटीबॉडीची निर्मिती

Patil_p

हिंदूधर्मीय हे काफिर, तर ज्यू इस्लामचे शत्रू!

Patil_p

चीनचा WHO विरोधात आक्रमक पवित्रा

datta jadhav
error: Content is protected !!