तरुण भारत

‘आप’सह छोटय़ा पक्षांसोबत आघाडीचा ‘सप’चा प्रयत्न

ओवैसींसाठी मात्र दरवाजे बंद – रालोदसोबत आघाडी निश्चित

वृत्तसंस्था/ लखनौ

Advertisements

उत्तरप्रदेशची सत्ता पुन्हा प्राप्त करण्यासाठी समाजवादी पक्षाकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. सप अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सर्व छोटय़ा राजकीय पक्षांसोबत आघाडी करण्याची तयारी चालविली आहे. यानुसार आम आदमी पक्षाचे उत्तरप्रदेश प्रभारी संजय सिंह यांनी बुधवारी अखिलेश यांची भेट घेत आघाडीसंबंधी चर्चा केली. आपसह अन्य छोटय़ा पक्षांचे अखिलेश स्वागत करत असले तरीही खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षापासून अंतर राखत आहेत.

उत्तरप्रदेश निवडणुकीपूर्वी समाजवादी पक्ष स्वतःची राजकीय समीकरणे घट्ट करू पाहत आहे. यानुसार ओमप्रकाश राजभर यांच्या पक्षानंतर जयंत चौधरींच्या रालोदसोबत आघाडी निश्चित करण्यात आली आहे. तर आता आम आदमी पक्ष आणि अपना दलाच्या एका गटासोबत मिळून निवडणूक लढण्यासाठी चर्चा सुरू झाली आहे. राज्यातील अन्य छोटय़ा राजकीय पक्षांना सोबत घेण्याची मोहीम अखिलेश यांनी उघडली आहे.

2022 मध्ये भाजपला पराभूत करण्यासाठी सपचे दरवाजे सर्व छोटय़ा पक्षासाठी खुले आहेत. कुठल्या पक्षासोबत आघाडी करावी याचा निर्णय अखिलेश यादव घ्sत असल्याची माहिती सप नेते सुनील सिंह साजन यांनी दिली आहे.

ओवैसी यांना आघाडीत नो एंट्री

अखिलेश यांनी यापूर्वीच ओवैसी यांच्या पक्षासोबत कुठल्याही प्रकारची आघाडी करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. उत्तरप्रदेशात समाजवादी पक्षाने आतापर्यंत रालोद, भारतीय सुहेलदेव समाज पक्ष, महान दल आणि जनवादी पक्षासोबत आघाडी निश्चित केली आहे.

कृष्णा पटेल-संजय सिंहांनी घेतली भेट

अपना दलाच्या अध्यक्षा कृष्णा पटेल आणि आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी बुधवारी अखिलेश यांची लखनौत भेट घेतली आहे. यादरम्यान दोन्ही पक्षांसोबत आघाडीसंबंधी चर्चा झाल्याचे संजय सिंह आणि पटेल यांनी मान्य केले आहे. तर अपना दलाकडून सपसोबत आघाडी निश्चित झाल्याचे सांगण्यात आले.

भाजपविरोधात आघाडी

उत्तरप्रदेशच्या सत्तेवरून भाजपला हटविण्याच्या रणनीतिवर आम्ही काम करत आहोत. यासंबंधी अखिलेश यांच्याशी चर्चा झाली असून यात भाजपच्या विरोधातील समान कार्यक्रमाचा मुद्दा सामील होता. अखिलेश हे उत्तरप्रदेशात भाजपच्या विरोधात संयुक्त आघाडी तयार करण्याच्या दिशेने काम करत आहेत. सपसोबत आम्ही आता चर्चा सुरू केल्याने लवकरच या दिशेने एखादा निर्णय घेतला जाणार असल्याचे संजय सिंह म्हणाले.

ध्रूवीकरण टाळण्याचा प्रयत्न

भाजपला ध्रूवीकरणाची संधी न देण्याच्या धोरणानुसार समाजवादी पक्ष ओवैसी यांच्यापासून अंतर राखत आहे. सप अन् ओवैसी यांच्या पक्षात आघाडी झाल्यास मुस्लीमधार्जिणे आणि कट्टरवादी पक्षासोबत उभे राहण्याचा आरोप होण्याची भीती अखिलेश यांना आहे.

Related Stories

सचिन पायलटांसाठी भाजपचे दरवाजे मोकळे

Patil_p

सरकारी कर्मचाऱयांसाठी कर्मयोगी योजना लागू

Patil_p

राबडीदेवींवर आधारित वेबसीरिज

Patil_p

दिल्लीत मागील 24 तासात 1,550 नवीन कोविड रुग्ण; 207 मृत्यू

Rohan_P

उत्तराखंडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 3 हजार पार

Rohan_P

भारतातील बळींमध्ये वाढ

Patil_p
error: Content is protected !!