तरुण भारत

भूगर्भात सातत्याने बाहेर येतेय पाणी

फॉसे डियोनी स्प्रिंगचे रहस्य कायम

पृथ्वी असंख्य रहस्यांना स्वतःच्या उदरात ठेवून आहे. या रहस्यांची उकल करण्याचा प्रयत्न वैज्ञानिक करत आहेत. यातील काही रहस्यांची उकल करण्यास त्यांना यश आले तर काहींबाबतचे गूढ कायम आहे. फ्रान्सच्या बरगंडी प्रांतात असेच एक रहस्यमय ठिकाण आहे. देशाच्या टोनेरे नावाच्या शहरात जमिनीतून दर सेकंदाला 300 लीटरहून अधिक बाहेर येत आहे. हजारो वर्षांपासून सातत्याने निघणारे पाणी आजही रहस्य आहे, कारण वैज्ञानिकांना आतापर्यंत याच्या स्रोताचा शोध लावता आलेला नाही.

Advertisements

या जमिनीतून बाहेर पडणाऱया पाण्याचा स्रोत जाणून घेण्याचा प्रयत्न कित्येकदा झाला, पण कुणालाच यश मिळालेले नाही. टोनेरेमध्ये जमिनीतून वर येणाऱया या पाण्याला फॉसे डियोनी स्प्रिंग या नावाने ओळखले जाते. फॉसे डियोनी स्प्रिंगमधून दर सेकंदाला जमिनीतून 300 लिटर पाणी बाहेर येते. पावसाळय़ात तर हे प्रमाण 3 हजार लिटर प्रति सेकंदापर्यंत पोहोचते. या झऱयाला तळच नसल्याचे आढळून आले आहे.

फ्रान्सचे लोक या रहस्यमय झऱयाला दैवी चमत्कार मानतात. रोमन लोक या झऱयाचे पाणी पित होते, तसेच 17 व्या शतकादरम्यान या झऱयात स्नानही करत होते असे बोलले जाते.

फॉसे डियोनी स्प्रिंग झऱयाचा स्रोत शोधण्याचा प्रयत्न अनेकदा झाला, या झऱयामध्ये उतरलेला कधीच परतला नसल्याचे सांगण्यात येते. याचा स्रोत शोधण्यासाठी गेलेल्या लोकांचा यात  बुडून मृत्यू झाला आहे. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये अनेक पाणबुडय़ांचाही समावेश आहे.

Related Stories

ज्वालामुखी पार करण्याचा विक्रम

Amit Kulkarni

गुरुपौर्णिमेला दत्तमंदिरात श्रीपाद वल्लभ दिगंबराचा गजर

Rohan_P

‘दगडूशेठ गणपती’ मंदिरात कोरोना संकट निवारणाकरीता विशेष याग

Rohan_P

मंगलमय वातावरणात अखिल मंडई मंडळात गणेशजन्म साजरा

Rohan_P

वर्षातील 300 दिवस झोपणारा नवा ‘कुंभकर्ण’

Patil_p

महालक्ष्मी मंदिरातील उत्सव मूर्तींची धान्यतुला व सोने-चांदी पुष्पअर्पण

Rohan_P
error: Content is protected !!