तरुण भारत

अंटार्क्टिकामध्ये पहिल्यांदाच उतरले एअरबस ए340

3000 फूट लांब धावपट्टीवर लँड झाले मोठे विमान

अंटार्क्टिकाच्या बर्फावर पहिल्यांदाच एअरबस ए340 विमान उतरले आहे. पर्यटनाच्या क्षेत्रात काम करणाऱया एका कंपनी समुहाने एअरबस ए-340 ला अंटार्क्टिकात सुरक्षित लँड करविण्याचा इतिहास रचला आहे. हाय फ्लाय नावाच्या एका एव्हिएशन कंपनीने ही फ्लाइट आयोजित केली आहे.

Advertisements

हाय फ्लाय 801 च्या या फ्लाइटने मंगळवारी दक्षिण आफ्रिकेच्या केप टाउन येथून उड्डाण केले होते. 5 तासांच्या प्रवासानंतर विमान अंटार्क्टिकामध्ये लँड झाले. केपटाउनला परतण्यासाठी उड्डाण करणाऱया फ्लाइटला हाय फ्लाय 801 नाव देण्यात आले.

दीर्घकाळापासून चाचणी

अंटार्क्टिकावर वर्षभर बर्फाचा अनेक मीटर उंच थर जमा राहिलेला असतो. बर्फावरच धावपट्टी तयार करण्यात आली असून ती 3000 फूट लांब आहे. 290 प्रवासी क्षमता असणारे 223 फूट लांबीच्या विमानाला लँड करण्यापूर्वी येथे 2019-20 दरम्यान सुमारे 6 चाचण्या करण्यात आल्या होत्या.

अनेक प्रकल्पांवर काम

अंटार्क्टिका हे उदयोन्मुख पर्यटन क्षेत्र आहे. याचमुळे कंपनी येथे अनेक अन्य प्रकल्पांवर काम करत असल्याचे हाय फ्लायकडून सांगण्यात आले. कंपनी विमान आणि चालक दलाचे सदस्य भाडेतत्वावर घेते आणि विमा, देखभाल आणि अन्य लॉजिस्टिक्सची जबाबदारीही कंपनीचीच असते.

वुल्फ गँग रिजॉर्टसाठी पुरवठा

ही विमानसेवा अंटार्क्टिकात काम करत असलेल्या वोल्फ्स गँग नावाच्या अँडव्हेंचर कँपने घडवून आणली होती. विमानातून वुल्फ गँग रिजॉर्टसाठी आवश्यक पुरवठा आणला गेला होता. या विमानाचे सारथ्य कॅप्टन कार्लोस मिरपुरी यांनी केले आहे. ते हाय फ्लायचे उपाध्यक्ष आहेत. टीमने अंटार्क्टिकावर सुमारे 3 तास वेळ घालविला आहे. या पूर्ण प्रवासात 2,500 नॉटिकल मैल व्यापले गेले.

50 धावपट्टय़ा अंटार्क्टिकामध्ये

ऑस्ट्रेलियाचे सैन्य वैमानिक आणि एक्सप्लोरर जॉर्ज हुबर्ट विल्किन्स यांनी 1928 मध्ये पहिल्यांदा अंटार्क्टिकासाठी उड्डाण केले होते. ते लॉकहीड वेगा 1 मोनोप्लेनद्वारे अंटार्क्टिकात पोहोचले होते. आतापर्यंत अंटार्क्टिकात कुठलेच विमानतळ तयार करण्यात आलेले नाही, पण तेथे 50 लँडिंग स्ट्रिप्स आणि धावपट्टय़ा आहेत.

Related Stories

चीनमध्ये 3 कोटी पुरुष अविवाहित

Patil_p

सिंगापूर : कोरोनाकाळात मुलांना जन्म देणाऱया पालकांना बेबी बोनस

Omkar B

भारतीय कंपन्यांनी दिला अमेरिकेत सव्वा लाख लोकांना रोजगार

datta jadhav

विदेशींना यंदा हज यात्रा मुकणार!

Patil_p

ट्रम्पपुत्रालाही लागण

Patil_p

अमेरिकेत 7 जूनपर्यंत संचारबंदी

datta jadhav
error: Content is protected !!