तरुण भारत

13 वर्षीय मुलीकडून अद्भूत शोध

उत्खननात मिळाला ‘खजिना’, एका दिवसात झाली प्रसिद्ध

मिल्ली हार्डविक स्वतःचे वडिल कॉलिन यांच्यासोबत खजिन्याचा शोध घेत असताना तिला खोदाईदरम्यान सोन्याची नाणी आणि बटणं मिळाली आहेत. मिल्लीने एक ऐतिहासिक शोध लावल्याने ती स्टार झाली आहे. तिने ख्रिस्तपूर्व 1300 सालामधील कुऱहाडीत वापरण्यात आलेल्या दगडांच्या 65 तुकडय़ांचा शोध लावला आहे. 13 वर्षीय मिल्लीने यापूर्वीच खोदाईदरम्यान यश मिळविले होते. कांस्य युगातील कुऱहाड शोधल्यावर मिल्लीने जेव्हा कधी मी खोदकाम करते, तेव्हा मला काही ना काही सामग्री मिळते असे म्हटले आहे.

Advertisements

सोन्याचे आच्छादन असलेले एक बटण आणि क्वीन एलिझाबेथचे नाणे सापडले आहे. कित्येक तास मैदानात राहिल्यावर जेव्हा सिग्नल मिळतो, तेव्हा अत्यंत आनंद होत असल्याचे ती सांगते. मिल्ली आता स्वतःच्या भागात लोकप्रिय ठरली आहे.

हा एक अद्भूत शोध आहे. अन्य डिडेक्टरिस्ट तिच्यासाठी आनंदी आहेत. हा जीवनात एकदाच लाभणारा शोध असल्याचे मत अनेकांदी व्यक्त केली. पण स्थानिक शोध घेणारे तिच्याशी ईर्ष्या करू लागले आहेत. मिल्लीला शोध घेणे आणि एका पुरातत्व तज्ञाप्रमाणे  काम करणे आवडत असल्याचे तिची आई क्लेयर हार्डविक यांनी सांगितले.

नियतकालिकात झळकली

भविष्यात मिल्ली स्वतःच्या या छंदालाच कारकीर्दीचे स्वरुप देऊ इच्छिते. मिल्लीच्या शोधानंतर पुरातत्व तज्ञांनी क्षेत्रात उत्खनन आणि विस्तृत तपासणीचे नेतृत्व केले. धातूच्या शोधाची माहिती देणारे प्रमुख नियतकालिक सर्चरने मिल्लीला स्वतःच्या मुखपृष्ठावर स्थान दिले आहे.

Related Stories

युक्रेन विमानाप्रकरणी पहिली कारवाई

Patil_p

सत्ता सोडण्यापूर्वी ट्रम्प यांनी दिला चीनला धक्का

datta jadhav

चीन महापुराच्या विळख्यात

Patil_p

इस्रायल : सरकार कठोर

Patil_p

मलेशियाचा पाकला धक्का; बोईंग-777 विमान केले जप्त

datta jadhav

”सत्तेत आल्यापासून नरेंद्र मोदींनी केली प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी”

Abhijeet Shinde
error: Content is protected !!