तरुण भारत

शेअर बाजारात पुन्हा घसरणीचे सत्र

सेन्सेक्स 323 तर निफ्टी 88अंकांनी प्रभावीत

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisements

भारतीय भांडवली बाजारतील कामगिरीमध्ये तिसऱया सत्रात बुधवारी शेवटच्या काही तासांमध्ये बाजारात करण्यात आलेल्या विक्रीच्या प्रभावामुळे बीएसई सेन्सेक्स 323 अंकांनी प्रभावीत होत बंद झाला आहे. यामध्ये अन्य कंपन्यांपैकी प्रामुख्याने  इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी यांचे समभाग मात्र नुकसानीत राहिले असल्याने याचा परिणाम भारतीय बाजारावर राहिल्याने बाजार पुन्हा घसरणीसह बंद झाला आहे. कारण मंगळवारच्या सत्रात बाजार तेजीत राहिला होता. ती तेजी टिकवण्यात सेन्सेक्सला यश मिळाले नसल्याचे पहावयास मिळाले आहे.

प्रमुख कंपन्यांच्या कामगिरीसोबत दिवसअखेर सेन्सेक्समधील विक्रीच्या दबावामुळे सेन्सेक्स 323.34 अंकांनी प्रभावीत 58,340.99 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 88.30 अंकांच्या नुसानीसोबत 17,415.05 वर बंद झाला आहे.

दिवसभरातील कामगिरीपैकी दिवसअखेर सेन्सेक्समधील मारुती सुझुकी, इन्फोसिस, टेक महिंद्रा, आयटीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, लार्सन ऍण्ड टुब्रो, अल्ट्राटेक सिमेंट आणि एचडीएफसी यांचे समभाग सर्वाधिक म्हणजे 2.62 टक्क्यांनी नुकसानीत राहिले असल्याचे दिसून आले आहे.

अन्य कंपन्यांपैकी आयसीआयसीआय बँक, एनटीपीसी, कोटक बँक, बजाज फायनान्स आणि पॉवरग्रिड कॉर्प यांचे समभाग लाभात राहिले आहेत. यामध्ये सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 22 समभाग नुकसानीत राहिले आहेत.

जागतिक बाजारातील स्थिती

आशियातील अन्य बाजारांमध्येही घसरणीचे सत्र राहिले आहे. अमेरिकन बॉण्डमधील तेजी आणि अमेरिकन तसेच अन्य देशातील कच्च्या तेलाचे भाव कमी करण्यासाठी करण्यात येणाऱया प्रयत्नांच्या स्थितीमुळे जागतिक पातळीवर किमतींमध्ये चढउतारासह घसणीचे वातावरण राहिले आहे. यासोबत शेअर बाजारातील उपलब्ध आकडेवारीनुसार विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मंगळवारी निव्वळ 4,477.06 कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री झाली आहे.

आगामी कालावधीत शेअर बाजार कोणते वळण घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार असून यामध्ये जागतिक घडामोडींसोबत देशातील विविध घडामोडींचा परिणाम सेन्सेक्ससोबत निफ्टीवर राहणार असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.

Related Stories

इलेक्ट्रिक स्कूटर बनविणार रोबोट

Patil_p

‘जिओ’ 5-जी स्पीडसाठी मेगा प्लॅनच्या तयारीत

Patil_p

असंघटित कामगारांसाठी धोरण हवे

Omkar B

नोव्हेंबरमध्ये ‘सेल’चे उत्पादन वाढले

Patil_p

10 हजार कोटींच्या व्यवहारावर टाटा-बिगबास्केटची सहमती

Omkar B

एसबीआय जनरल इन्शुरन्सकडून शगुन गिफ्ट इन पॉलिसी सादर

Patil_p
error: Content is protected !!