तरुण भारत

तात्यासाहेब तेंडुलकर व्याख्यानमाला रविवारपासून

प्रतिनिधी / कोल्हापूर

ब्राह्मणसभा करवीर (मंगलधाम) आणि शतक महोत्सवाकडे वाटचाल करणारी श्री महालक्ष्मी को-ऑप. बँक लि. यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारपासून (28 नोव्हेंबर) तात्यासाहेब तेंडुलकर स्मृति व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. प्रायव्हेट हायस्कूलच्या सभागृहात शनिवार 4 डिसेंबर पर्यंत चालणाऱया या व्याख्यानमालेत सात मान्यवर व्याख्याते मागदर्शन करणार आहेत. ही माहिती ब्राह्मणसभा करवीरचे अध्यक्ष नंदकुमार मराठे, महालक्ष्मी बँकेचे अध्यक्ष विनोद डिग्रजकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अनुराधा तेंडुलकर, केदार तेंडुलकरही उपस्थित होते.

Advertisements

उद्योगपती दानशूर व्यक्तीमत्व स्वर्गीय तात्यासाहेब तेंडुलकर यांच्या कार्याचे स्मरण चिरंजीवी रहावे यासाठी गेली वीस वर्षे या व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. गतवर्षी कोरोनामुळे व्याख्यानमाला होऊ शकली नव्हती. यंदा ती आयोजित करण्याचा निर्णय संयोजकांनी घेतला. त्यानुसार येत्या रविवार 28 नोव्हेंबर ते शनिवार 4 डिसेंबर या कालावधीत व्याख्यानमालेत कोल्हापूरचे प्रसिद्ध डॉ. दीपक आंबर्डेकर, नाशिकचे अभिनेता, दिग्दर्शक योगेश सोमण, गोव्याचे दत्तप्रसाद जोग, पुण्याचे मिलिंद जोशी, कोल्हापूर डॉ. अमर आडके, पुण्यो गोपाळ जोशी, नाशिकचे निवृत्त पोलीस निरीक्षक सुहास गोखले आदी मान्यवर सात पुष्पे गुंफणार आहेत. सायंकाळी 6 वाजता प्रायव्हेट हायस्कूलच्या सभागृहात व्याख्यान होईल. व्याख्यान आयोजनासाठी तेंडुलकर परिवाराचे बहुमोल सहकार्य आहे. व्याख्यानमालेचे प्रमुख ऍड. विवेक शुक्ल, संयोजन सल्लागार निरूपणकार दीपक भागवत आहेत, असे मराठे आणि डिग्रजकर यांनी सांगितले.

कोरोनाचे नियम पाळून व्याख्यानमाला

कोरोनासंदर्भातील शासकीय नियमानुसार व्याख्यानमाला होणार आहे. श्रोत्यांना मास्क वापरणे आणि सोशल डिस्टिन्सिगचे पालन करणे अनिवार्य आहे.

व्याख्यानमालेचा कार्यक्रम असा

दिनांक व्याख्याता विषय

28 नोव्हेंबर डॉ. दीपक भागवत कोरोनाःआरोग्याची नवीन आव्हाने
29 नोव्हेंबर योगेश सोमण क्रांतीसूर्य -सावरकर
30 नोव्हेंबर दत्तप्रसाद जोग गीत रामायण-गदिमा ः एक निरीक्षण
1 डिसेंबर मिलिंद जोशी जीवनातील विनोदाचे स्थान
2 डिसेंबर डॉ. अमर आडके सहÎाद्रीच्या गिरीशिखरावरून
3 डिसेंबर गोपाळ जोशी अफगाणिस्तान समस्य व भारत
4 डिसेंबर सुहास गोखले अंमली पदार्थ व तरुण पिढी

Related Stories

खडतर परिस्थितीतून यश मिळवणारा संदेश

Abhijeet Shinde

कोल्हापूर : प्रदेश काँग्रेसच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार

Abhijeet Shinde

बहिण भावाची वीण घट्ट करणार फक्त एक व्हॉटस अ‍ॅप नंबर

Abhijeet Shinde

धामोड येथे चोरटयांनी फोडली चार दुकाने

Abhijeet Shinde

गोकुळ शिरगाव एमआयडीसीमध्ये काम करणारे दोन कर्मचारी पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

नेत्यांकडून मतांची गणिते, `हातच्या’ मतदारांकडे!

Sumit Tambekar
error: Content is protected !!