तरुण भारत

अबु धाबी टी-10 लीग- बांगला टायगर्सचा दुसरा विजय

वृत्त संस्था/ अबु धाबी

येथे सुरू असलेल्या अबु धाबी टी-10 क्रिकेट स्पर्धेतील मंगळवारी झालेल्या सामन्यात बांगला टायगर्सने चेन्नई ब्रेव्हजचा 9 गडय़ांनी दणदणीत पराभव केला. या स्पर्धेतील बांगला टायगर्सचा हा दुसरा विजय आहे.

Advertisements

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नई ब्रेव्हजने 10 षटकात 6 बाद 90 धावा जमविल्या. त्यानंतर बांगला टायगर्सने 4.2 षटकात 1 बाद 91 धावा जमवित हा सामना 9 गडय़ांनी एकतर्फी जिंकला.

चेन्नई ब्रेव्हजच्या डावात अँजेलो परेराने 26 तर समीउल्ला शेनवारीने 20 धावा जमविल्या. मार्क डेयालने 7 चेंडूत 15 धावा केल्या. बांगला टायगर्सतर्फे हॉवेलने 22 धावांत 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना बांगला टायगर्स संघातील सलामीची जोडी जॉन्सन चार्ल्स आणि एच. झेझई यांनी पहिल्या चेंडूपासून आक्रमाक फटकेबाजी केली.

डावातील मुनाफ पटेलच्या पहिल्या षटकात चार्ल्सने सलग 3 षटकार ठोकले. त्यानंतर अफगाणच्या झेझाईने डावातील कँफरच्या दुसऱया षटकात 2 षटकार आणि 3 चौकारांसह 26 धावा झोडपल्या. संघाचे अर्धशतक 2.1 षटकात फलकावर लागले. चेन्नई ब्रेव्हज संघातील गोलंदाज वॉकरने आपल्या एका षटकात 21 धावा दिल्या. बांगला टायगर्सने पहिल्या तीन षटकात 67 धावा जमविल्या. डेयालने चार्ल्सला बाद केले. जॅक्सने 9 चेंडूत नाबाद 34 धावा जमवित  आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

संक्षिप्त धावफलक

 चेन्नाई ब्रेव्हस -10 षटकात 6 बाद 90 (अँजेलो परेरा 26, समीउल्ला शेनवारी 20, हॉवेल 2-22), बांगला टायगर्स 4.2 षटकात 1 बाद 91 (चार्ल्स 36, झेझाई नाबाद 34, जॅक्स नाबाद 34, डेयाल 1-14).

Related Stories

स्पेनचा डेव्हिड ग्रँड जमशेदपूर एफसी संघात दाखल

Patil_p

विंडीजचा संघ मोठय़ा पराभवाच्या छायेत

Patil_p

पराभवाची परतफेड करण्याचे आव्हान

Patil_p

फिनलंडचा डेन्मार्कवर विजय

Patil_p

फेडरर, मेदवेदेव्ह, केर्बर, कॉर्नेट दुसऱया फेरीत

Patil_p

बेलग्रेडच्या पाच फुटबॉलपटूंना कोरोनाची बाधा

Patil_p
error: Content is protected !!