तरुण भारत

स्वीडन पंतप्रधानपदी मॅग्डेलेना अँडरसन

देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान – केवळ एक मताने संसदेत मिळाला विजय

वृत्तसंस्था / स्टॉकहोम

Advertisements

स्वीडनच्या संसदेने बुधवारी मॅग्डेलेना अँडरसन यांना देशाच्या पहिल्या महिला  पंतप्रधान म्हणून मंजुरी दिली आहे. अँडरसन सध्या देशाच्या अर्थमंत्री आहेत. त्या शुक्रवारी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. चालू महिन्याच्या प्रारंभी अँडरसन यांची सोशल डेमोक्रेटिक पार्टीच्या नेतेपदी निवड झाली होती.

अँडरसन बुधवारी संसदेत बहुमताच्या आकडय़ापासून (175) दूर होत्या. मते कमी असूनही त्यांची पंतप्रधानपदी निवड करण्यात आली. स्वीडनमध्ये पंतप्रधान होण्यासाठी संसदेत बहुमत असणे आवश्यक नाही, पण बहुमताच्या संख्येइतक्या खासदारांनी संबंधित उमेदवाराला विरोध न करणे आवश्यक आहे. संसदेच्या 349 सदस्यांपैकी 174 सदस्यांनी अँडरसन यांच्या विरोधात मतदान केले. तर 111 खासदारांनी त्यांना पाठिंबा दर्शविला. 57 खासदारांनी मतदानात भाग घेतला नव्हता. तर एक खासदार गैरहजर होता.

1996 मध्ये राजकारणात पाऊल

अँडरसन यांनी स्वतःच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात 1996 मध्ये केली होती. तत्कालीन पंतप्रधान गोरान पर्सन यांच्या त्या राजकीय सल्लागार होत्या. अँडरसन यांनी उप्साला विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले असून त्या ज्युनियर स्वीमिंग चॅम्पियन राहिल्या आहेत.

विरोधी पक्षांचे आव्हान

पुढील काळात अँडरसन यांना विरोधी पक्षांच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. सरकारच्या अर्थसंकल्पाला विरोध करणार असल्याची भूमिका विरोधी पक्षांनी घेतली आहे. अँडरसन यांनी पूर्वी सेंट्रल पार्टी आणि सोशल डेमोक्रेट्स पार्टीचे समर्थन प्राप्त केले होते. पण सेंट्रल पार्टी त्यांच्या दावेदारीला विरोध करण्याची भीती होती. पंतप्रधान म्हणून अँडरसन यांना पाठिंबा देऊ पण सरकारच्या अर्थसंकल्पाला विरोध करणार असल्याचे सेंट्रल पार्टीने म्हटले आहे.

डाव्या पक्षाकडून मिळविले समर्थन

54 वर्षीय अँडरसन यांनी संसदेत लेफ्ट पार्टीसोबत एक करार केला आहे. यात समर्थनाच्या बदल्यात गरिबांची पेन्शन वाढविण्याची मागणी मान्य करण्यात आली. अँडरसन यांनी अत्यंत गरीब पेन्शनधारकांची आर्थिक स्थिती मजबूत करणाऱया एका करारावर सहमत झालो असल्याचे म्हटले आहे. 7 वर्षांपर्यंत स्वीडनचे पंतप्रधान राहिलेले स्टीफन लोफवेन यांची जागा अँडरसन घेणार आहेत. स्टीफन यांनी 10 नोव्हेंबरला राजीनामा दिला होता.

Related Stories

कोरोनामुक्तांमध्ये वेगाने केस गळण्याची समस्या

Patil_p

चीनच्या ‘कुआईझाऊ-11’ चे लॉन्चिंग अयशस्वी

datta jadhav

ट्रम्प, मेलानिया, बायडेन, कमला हॅरिस यांच्याकडून दिवाळी सणाच्या शुभेच्छा

Patil_p

फायजरकडून कोरोनावरील औषधाची निर्मिती

Patil_p

कंगाल पाकिस्तानला आयएमएचा मोठा झटका

Patil_p

मेक्सिकोत कोरोनाबळींची संख्या 1.62 लाखांवर

datta jadhav
error: Content is protected !!