तरुण भारत

विंडीजचा संघ मोठय़ा पराभवाच्या छायेत

348 धावांचा पाठलाग करताना विंडीज 6 बाद 52

वृत्त संस्था/ गॅले

Advertisements

येथे सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत खेळाच्या चौथ्या दिवसाअखेर विंडीजचा संघ मोठय़ा पराभवाच्या छायेत वावरत आहे. यजमान लंकेने विंडीजला निर्णायक विजयासाठी 348 धावांचे कठीण आव्हान दिले असून विंडीजची दुसऱया डावात स्थिती 6 बाद 52 अशी केविलवाणी झाली आहे. लंकेचा संघ हा सामना मोठय़ा फरकाने जिंकून मालिकेत आघाडी घेण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

या कसोटीत लंकेने पहिल्या डावात 386 धावा जमविल्या. त्यानंतर विंडीजचा पहिला डाव 230 धावा आटोपल्याने लंकेने पहिल्या डावात 156 धावांची आघाडी मिळविली. लंकेने आपला दुसऱया डाव 4 बाद 191 धावांवर घोषित करून विंडीजला विजयासाठी 348 धावांचे कठीण आव्हान दिले.

लंकेच्या अचूक गोलंदाजीसमोर विंडीजची दुसऱया डावात स्थिती 6 बाद 52 अशी केविलवाणी झाली आहे. या कसोटीतील खेळाचा एक दिवस बाकी असून केवळ खराब हवामान वेंडीजला पराभवापासून वाचवू शकेल. या कसोटीतील खेळाच्या तिसऱया दिवशी अंधुक प्रकाश आणि पावसामुळे दोन तासांचा खेळ वाया गेला होता. अंधुक प्रकाशामुळे चौथ्या दिवशीच्या खेळाला उशिरा प्रारंभ करण्यात आला होता.

विंडीजने 9 बाद 224 या धावसंख्येवरून चौथ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचा पहिला डाव 230 धावांत आटोपला. विंडीजच्या डावात सलामीच्या कर्णधार ब्रेथवेटने 41, ब्लॅकवूडने 20, हॉपने 10, मेयर्सने 45, होल्डरने 36, डिसिल्वाने नाबाद 15 कॉर्नवॉलने 39 धावा जमविल्या. लंकेतर्फे जय विक्रमाने 40 धावांत 4 तर रमेश मेंडीसने 75 धावात 3, धनंजय डिसिल्वा, इंबुल्  डेनिया आणि लकमल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. लंकेने पहिल्या डावात  156 धावांची आघाडी मिळविली.

156 धावांची आघाडी घेत लंकेने आपल्या दुसऱया डावाला प्रारंभ केला. त्यांनी 40.5 षटकात 4 बाद 191 धावांवर डावाची घोषणा करत विंडीजला निर्णायक विजयासाठी 348 धावांचे आव्हान दिले. लंकेच्या दुसऱया डावात कर्णधार करूणारत्नेने 134 चेंडूत 9 चौकारांसह 83 तर ओशादा फर्नांडोने 1 चौकारांसह 14, निशांकाने 3, अँजेलो मॅथ्यूजने 54 चेंडूत 2 षटकार आणि सहा चौकारांसह नाबाद 69, धनंजय डिसिल्वाने 1 आणि चंडीमलने 1 चौकारांसह नाबाद 10 धावा जमविल्या. विंडीजतर्फे कॉर्नवालने 60 धावांत 2 तर वेरीकेनने 46 धावांत 2 गडी बाद केले.

लंकेच्या भेदक गोलंदाजीसमोर विंडीजचे फलंदाज कोलमडले. दिवसअखेर विंडीजची दुसऱया डावात स्थिती 25.3 षटकात 6 बाद 52 अशी केविलवाणी झाली. विंडीजच्या डावात ब्लॅकवूडने 9, हॉपने 3, कर्णधार ब्रेथवेटने 0, चेसने 1, मेयर्सने 2, होल्डरने 0 धावा जमविल्या. डीसिल्वा 2 चौकारांसह 15, बॉनेर 1 चौकारांसह 18 धावांवर खेळत आहेत. लंकेतर्फे रमेश मेंडीसने 17 धावांत 4 तर इंबुल्डेनियाने 18 धावांत 2 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक

लंका प. डाव सर्व बाद 386, विंडीज प. डाव 85.5 षटकांत सर्वबाद 230 (मेयर्स 45, ब्रेथवेट 41, ब्लॅकवूड 20, हॉप 10, होल्डर 36, डिसिल्वा नाबाद 15, कॉर्नवॉल 39, जयविक्रमा 4-40, रमेश मेंडीस 3-75, डिसिल्वा 1-11, इंबुलडेनिया 1-67, लकमल 1-10), लंका दु. डाव-40.5 षटकांत 4 बाद 191 डाव घोषित (करूणारत्ने 83, निशांका 3, ओशादा फर्नांडो 14, मॅथ्यूज नाबाद 69, डिसिल्वा 1, चंडीमल नाबाद 10, कॉर्नवॉल 2-60, वेरीकेन 2-42), विंडीज दु.डाव 25.3 षटकांत 6 बाद 52 (ब्रेथवेट 0, ब्लॅकवूड 9, बॉनेर खेळत आहे 18, हॉप 3, चेस 1, मेयर्स 2, होल्डर 0, डिसिल्वा खेळत आहे. 15, रमेश मेंडीस 4-17, इंबुल्डेनिया 2-18).

Related Stories

रिषभ पंतला पहिला डोस

Amit Kulkarni

चिलीला नमवून ब्राझील उपांत्य फेरीत

Patil_p

‘वन-लेग स्टान्स’वर जिंकले वेटलिफ्ंटगचे सुवर्ण!

Patil_p

फुटबॉल सम्राट पेले यांच्या प्रकृतीत सुधारणा

Patil_p

न्यूझीलंडचा बांगलादेशवर 27 धावांनी विजय

Patil_p

ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंडवर 17 धावांनी विजय

Patil_p
error: Content is protected !!