तरुण भारत

सिंधू उपउपांत्यपूर्व फेरीत, लक्ष्य, कश्यप पराभूत

वृत्तसंस्था/ जकार्ता

इंडोनेशिया खुल्या पुरूष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने महिला एकेरीची उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. मात्र, पुरूष विभागात भारताच्या लक्ष्य सेन आणि पी. कश्यप यांचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले.

Advertisements

महिला एकेरीच्या बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात भारताची विद्यमान विश्वविजेती तसेच दोनवेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूने जपानच्या आया ओहोरीचा 17-21, 21-17, 21-17 असा पराभव करत उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. सिंधूला विजयासाठी 70 मिनिटे झगडावे लागले.

पुरूष एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात जपानच्या मोमोटाने भारताच्या लक्ष्य सेनचे आव्हान 23-21, 21-15 असे संपुष्टात आणले. आतापर्यंत दोनवेळा विश्वविजेतेपद मिळविणाऱय्या जपानच्या मोमोटाने हा सामना 53 मिनिटात जिंकला. दुसऱया एका सामन्यात सिंगापूरच्या लोह येयूने भारताच्या पी. कश्यपवर 22-20, 21-13 अशी मात केली.

पुरूष दुहेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात कोरियाच्या चोई सोलगेयू आणि कीम वॉनहो यांनी भारताच्या एम.आर. अर्जुनöध्रृव कपिला यांचे आव्हान 22-20, 21-13, जर्मनीच्या जेनसेन-इफलेर या जोडीने भारताच्या वेंकट गौरव प्रसाद आणि जुई देवांगन यांचा 21-12, 21-4 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले.

Related Stories

नेमबाजांसाठी सक्तीचे शिबिर लांबणीवर

Patil_p

विराट, डीव्हिलियर्स आरसीबी संघात दाखल

Amit Kulkarni

भारतीय हॉकी प्रशिक्षकांसाठी कार्यशाळा

Patil_p

टाटा ओपन टेनिस स्पर्धेच्या तारखेत बदल

Patil_p

तिरंदाज प्रशिक्षक सदस्याला कोरोनाची बाधा

Patil_p

गंभीरने केले मोलकरणीचे अंत्यसंस्कार

Patil_p
error: Content is protected !!