तरुण भारत

शाहूपुरीतील जलवाहिनी गळती काढण्याचे काम सुरु

भारत भोसले यांच्या मागणीची दखल

प्रतिनिधी/ सातारा

Advertisements

गेल्या अनेक महिन्यांपासून शाहूपुरी चौकाच्या परिसरातील रस्त्यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाणी पुरवठा करणाऱया मोठया जलवाहिन्यांमधून पाणी गळती सुरु होती. याबाबत शाहूपुरी ग्रामविकास आघाडीतर्फे भारत भोसले यांनी दोन, तीन वेळा निवेदने दिल्यानंतर अखेर बुधवारपासून प्राधिकरणाकडून पाणी गळती काढण्याच्या कामास आरंभ करण्यात आला आहे.

शाहूपुरी चौक परिसरात माळवाडीकडे जाणारा रस्ता तसेच रांगोळे कॉलनीकडे जाणा-या रस्त्यावर गेले अनेक महिन्यांपासून पाणी गळती होत सुरु आहे. तसेच रांगोळे कॉलनीकडे जाणाऱया रस्त्यावर असणारी गळती ही मोठय़ा प्रमाणावर आहे. रस्त्याखालून वाहणारे पाणी हे जादा प्रमाणात वाहत असल्याने त्याचा परिणाम  दैनंदिन होणाऱया पाणी पुरवठय़ावर होत आहे.

याबाबत भारत भोसले यांनी दोन वेळा निवेदने देवून शाहूपुरीतील गळती काढण्याची मागणी प्राधिकरणाच्या अधिकाऱयांची समक्ष भेट घेवून केली होती. तसेच पाणी गळती न काढल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर तरीही त्यानंतर तब्बल 15 दिवसांनी प्राधिकरणाने त्याची दखल घेतली. बुधवारपासून जेसीबीसह कामगारांच्या सहाय्याने गळती काढण्याच्या कामास आरंभ झाला आहे.

Related Stories

शहर कोरोनामुक्त करण्यासाठी उपनगराध्यक्षांची प्रयत्नांची पराकाष्ठा

Patil_p

राज्यातील विधानपरिषदेच्या ६ जागांसाठी बिगुल वाजले

Sumit Tambekar

रानमेवा बाजारपेठेत दाखल

Patil_p

भाजपमध्ये गेलेल्या घुसखोरांनी माहौल बिघडवला; संजय राऊतांच्या टोला

Abhijeet Shinde

जरंडेश्वर कारखान्यावरील ईडी कारवाई विरोधात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मोर्चा

Abhijeet Shinde

सातारा : प्रतापसिंहनगरात तलवार हल्ला करणाऱ्या दोघांना अटक

datta jadhav
error: Content is protected !!