तरुण भारत

पाटण, वडूजसह सहा नगरपंचायतींसाठी 21 डिसेंबरला मतदान

1 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ

प्रतिनिधी/ कराड

Advertisements

सातारा जिल्हय़ातील पाटण, वडूज, लोणंद, कोरेगाव, खंडाळा व दहिवडी या सहा नगरपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. 1 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार असून 21 डिसेंबरला मतदान होणार आहे.

जिल्हय़ातील या सहा नगरपंचायतींची आरक्षण सोडत, प्रभाग रचना नुकतीच पार पडली होती. सद्यस्थितीत मतदार यादी वॉर्डनिहाय अंतिम करण्याचा कार्यक्रम सुरू आहे. 29 नोव्हेंबरला वॉर्डनिहाय मतदार यादी दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील मुदत संपणाऱया व नवनिर्मित अशा 115 नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

30 नोव्हेंबरला जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जारी करणार आहेत. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर नामनिर्देशन पत्र भरण्याचा कालावधी 1 ते 7 डिसेंबर आहे. याच कालावधीत नामनिर्देशन पत्रे ऑफलाईन स्वीकारण्याचा कालावधी आहे. 8 रोजी छाननी होणार असून 13 डिसेंबरअखेर अर्ज माघारीची मुदत आहे. तर 21 डिसेंबरला मतदान होणार असून 22 रोजी मतमोजणी होणार आहे.

Related Stories

सातारा : रिक्षा चालकांकडून ग्राहकांची लूट

datta jadhav

”अफगाणिस्तान दहशतीमागे दोन भारतीयांचा हात ?”

Abhijeet Shinde

अखेर तासगाव आगारातील ‘ती’ महिला अधिकारी निलंबित

Abhijeet Shinde

कोल्हापूर : राम मंदीर पायाभरणी कार्यक्रम उत्साहात साजरा करा, भाजपाचे आवाहन

Abhijeet Shinde

ठरलं…उदयसिंह पाटील आठवडय़ात काँग्रेसमध्ये सक्रीय

Abhijeet Shinde

रक्षाबंधनानिमित्त पंकजा मुंडेंचा खास संदेश ; म्हणतात, बहिणींसाठी ‘एवढं’ केलत तरी मला आनंद

Abhijeet Shinde
error: Content is protected !!