तरुण भारत

महामार्गावर वाघवाडी येथे कोकेन बाळगणारा परदेशी तरुण जेरबंद

तरुण टांझानियाचा, बसने मुंबई-बेंगळूर प्रवास करीत होता, ११ लाखांचे १०९ ग्रॅम कोकेन हस्तगत, इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद

प्रतिनिधी/इस्लामपूर

Advertisements

पुणे-बेंगळूर आशियाई मार्गावर सांगली जिल्ह्यातील वाघवाडी फाटा येथे बेकायदा कोकेन अंमली पदार्थ बाळगून प्रवास करणाऱ्या टांझानिया देशातील तरुणास पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून सुमारे ११लाख रुपये किंमतीचे १०९ ग्रॅम कोकेन हस्तगत केले आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे.

माकेटो जॉन झाकिया(२५,रा. जमोरिया मंगानो, टांझानिया) असे संशयित आरोपींचे नाव आहे. झाकिया हा खाजगी ट्रॅव्हल्स बस क्र. के.ए.-५१-ए.एफ.६२९१ मधून अंमली पदार्थ जवळ बाळगून प्रवास करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी वाघवाडी फाटा (ता. वाळवा, जि. सांगली) येथे सापळा लावला. बसची झडती घेतली असता झाकिया हा आसन क्र. एल-१३ बसला होता. त्याच्या बॅग मध्ये १०९ ग्रॅम कोकेन अमली पदार्थ मिळून आला. अंमली पदार्थ व एक मोबाईल पोलिसांनी हस्तगत करीत त्याच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्याचे हवालदार दीपक ठोंबरे यांनी वर्दी दिली.झाकिया विरुध्द अंमली पदार्थ द्रव्य व मनप्रभावी पदार्थ अधि.१९८५ चे कलम १६,२१ नुसार गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास सपोनि साळुंखे करीत आहेत.

Related Stories

कोरोनामुळे शाळा पडली बंद; शिक्षकाने सुरू केला गांजा तस्करीचा व्यवसाय

Rohan_P

आता अखिलेश यादवांनीही ‘खेला होबे’ म्हणत भाजपाविरोधात ठोकला शड्डू

Abhijeet Shinde

पेट्रोल – डिझेलच्या दरांत पुन्हा वाढ; मुंबईत पेट्रोल शंभरीपार

Rohan_P

कृषी राज्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात

datta jadhav

सांगली : श्रीराम मंदिर भूमीपूजन सोहळ्यानिमित्त आमदारांनी साजरा केला आनंदोत्सव

Abhijeet Shinde

ठाकरे सरकारकडून लवकरच साडे बारा हजार पोलिसांची भरती

Rohan_P
error: Content is protected !!