तरुण भारत

डेक्कन क्लिफहँगर पुणे ते गोवा 646 किमी सायकल शर्यत यशस्वी

प्रतिनिधी /बेळगाव

पुणे ते बेळगाव अल्ट्रा सायकल आठवी द डेक्कन क्लिफहँगर सायकल शर्यत बीपीन देवीस, फराज अमर, सागर एम. सी. सिद्धार्थ एच. यांनी 21 तास 1 मिनिट अंतरात पूर्ण करून यांनी विजेतेपद पटकाविले. सोलो स्पर्धेत मुंबईच्या कबीर रायचुरेने 22 तास 51 मिनिटे 44 सेकंदांत पूर्ण करून प्रथम क्रमांक पटकाविला.

Advertisements

पुणे-गोवा 20 व 21 नोव्हेंबर अल्ट्रा सायकल शर्यतीची 8 वी द डेक्कन क्लिफहँगर आवृत्ती अवकाळी मुसळधार पावसामुळे नेहमीपेक्षा कठीण होती. जगातील सर्वात खडतर सायकल शर्यत संपूर्ण अमेरिकेतील शर्यतीसाठी पात्र होण्यासाठी, रेसर्सना 626 किमी अंतर पूर्ण करावे लागले. भारतातील अल्ट्रा सायकलिंगचे केंद्र असलेल्या पुण्यातील 44 सोलो सायकलपटूंनी तसेच, 13 रिले संघ, मंगळुरू, बेंगळूर, कोईम्बतूर, वडोदरा आणि भोपाळसह संपूर्ण भारतातून रेसर्सनी भाग घेतला होता. या सायकल शर्यतीची सुरूवात द क्लिफ, फॉरेस्ट टेल्स, भूगाव येथून मैथिली जोग, संतोष पवार, चैतन्य वेल्हाळ आणि पुण्यातील सर्व 3 प्रसिद्ध सायकलपटूंनी या शर्यतीला ध्वज उंचावून सुरूवात केली. शर्यतीला पुण्याहून सुरूवात झाली. त्यानंतर त्यांचे पाचगणी, सह्याद्रीच्या पाचवडहून धारवाडला  व पुढे  बेळगावला आगमन झाले.

रात्री 11.30 नंतर रेसर्स दीपेन शहा यांच्या मालकीच्या इनफिनिटी स्टुडिओत बेळगावला दाखल झाले. नंतर दुसऱया दिवशी सकाळी 10 वा. बेळगाव सायकलपटू तेथून ही शर्यत चोर्ला घाटमार्गे बोगमलोगोवा येथे निघाले. कोल्हापूर विभागात दुपारपासून सुरू झालेला मुसळधार पाऊस संध्याकाळीही सुरू राहिल्याने कठीण आव्हान होते. थंड वातावरणाने रेसर्सना पसंती दिल्याचे दिसून आले.

या वषीचा सर्वात वेगवान संघ बेंगळुरूचा होता, विपिन देवीस, फराज उमर, सागर एम. सी., सिद्धार्थ एच., यांनी 21 तास आणि 1 मिनिटांत अंतर पूर्ण केले. त्यांनी या वषी टीम रिले स्पिरिट फास्टेस्ट टू फिनिशचा पुरस्कार पटकाविला.

वैयक्तिक स्पर्धेत नवी मुंबईतील पुरुषांच्या 18-49 वयोगटात कबीर रायचुरे यांनी 22 तास 51 मिनिटे 44 सेकंदात अंतिम फेरी गाठण्यासाठी अप्रतिम गती प्रस्थापित केली. यावषी शिरीन केकरे हिने शर्यत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मान्यवरांच्या हस्ते वरील विजेत्या सायकलपटूंचा पदके, प्रमाणपत्र व भेटवस्तू देवून गौरव करण्यात आला.

Related Stories

बेळगाव-शेडबाळ पॅसेंजर 16 सप्टेंबरपर्यंत रद्द

Amit Kulkarni

शहरातील पाणीपुरवठय़ात उद्या व्यत्यय

Patil_p

युवा समितीच्यावतीने तिवोली येथे मास्कचे वितरण

Amit Kulkarni

गनिमी काव्याने हदनाळमध्ये फडकवला भगवा!

Amit Kulkarni

पिरनवाडीतील कचऱयाची समस्या बनली गंभीर

Amit Kulkarni

शहापूर भागातील पारायण सोहळय़ाची सांगता

Patil_p
error: Content is protected !!