तरुण भारत

प्रज्वल, श्रीरंग, मंदास, सक्षम, पार्थ विजेते

शेख पदवीपूर्व महाविद्यालय आयोजित तालुकास्तरीय महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा

क्रीड प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

शेख पदवीपूर्व महाविद्यालय आयोजित तालुकास्तरिय पदवीपूर्व शिक्षण खात्याच्या मुलांच्या बुद्धिबळ स्पर्धेत जीएसएस महाविद्यालयाच्या 3, आरपीडी व केएलई इनडिपेंडंट महाविद्यालयाच्या प्रत्येकी 1 खेळाडूने विजेतेपद पटकाविले आहे.

नेहरूनगर येथील शेख पदवीपूर्व महाविद्यालयाच्या सभागृहात बेळगाव जिल्हा सार्वजनिक शिक्षण खात्याच्या पदवीपूर्व महाविद्यालयात पुरूषांच्या बुद्धिबळ स्पर्धेचे महाविद्यालयाचे प्राचार्य गजेंद्र पवार, क्रीडा प्राध्यापक डॉ. अमित जडे, प्रा. रणजित कणबरकर, प्रा. छत्रसाली आदी मान्यवरांच्या हस्ते सोंगटय़ांना चाल देऊन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत 25 हून अधिक बुद्धिबळपटूंनी भाग घेतला
होता.

पाच विजेते स्पर्धक पुढीलप्रमाणे- प्रज्वल एम जोशी (जीएसएस), श्रीरंग हदगल (केएलई इनडिफेंडंट), मंदास हलकेरी (जीएसएस), सक्षम आर जाधव (आरपीडी), पार्थ पी गुंजीकर (जीएसएस महाविद्यालय) यांनी विजेतेपद पटकाविले. संतोष मठद (आर. ए. पीयू), आदित्य तेलंग (सेंट पॉल्स कॉलेज) हे दोघे खेळाडू राखीव खेळाडू आहेत. वरील 5 खेळाडू जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.

Related Stories

बेळगावात प्रचाराला रंग भरू लागला

Amit Kulkarni

जांबोटी येथे दूर्गामाता दौडीला प्रारंभ

Patil_p

परराज्यातून आलेल्या नागरिकांबद्दल स्थानिक सतर्क

Patil_p

चन्नम्मा चौकात वाहतुकीची कोंडी

Patil_p

आनंदवाडीतील नागरिकांची मनपाकडे धाव

Patil_p

आलमट्टीतील उद्यान आजपासून खुले

Patil_p
error: Content is protected !!