तरुण भारत

एमव्हीएम, कनक, हेरवाडकर, ज्ञान प्रबोधन संघ विजयी

फादर एडी आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

सेंट पॉल्स स्कूल आयोजित रेव्ह. फादर एडी स्मृती चषक 54 व्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत बुधवारी एम. व्ही. एम. कनक, एम. व्ही. हेरवाडकर, ज्ञान प्रबोधन, सेंट मेरीज, सेंट झेवियर, सर्वोदय खानापूर संघांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून प्रत्येकी 3 गुण मिळविले.

सेंट पॉल्स हॉस्टेल मैदानावर पहिल्या सामन्यात एम. व्ही. एम. संघाने अमृता विद्यालय संघाचा 3-0 असा पराभव केला. 11 व्या मिनिटाला सुजलने एमव्हीएमला पहिला गोल करून दिला. 13 व्या मिनिटाला साईप्रसादने दुसरा गोल करून पहिल्या सत्रात आघाडी भक्कम केली. दुसऱया सत्रात 32 व्या मिनिटाला अथर्वने तिसरा गोल करून 3-0 ची आघाडी मिळवून दिली. दुसऱया सामन्यात कनक संघाने गोमटेशचा 2-1 असा पराभव केला. 15 व्या मिनिटाला कनकच्या समृद्धने पहिला गोल केला. 16 व्या मिनिटाला गोमटेशच्या दर्शनने गोल करून 1-1 अशी बरोबरी करून दिली. दुसऱया सत्रात 35 व्या मिनिटाला कनकच्या अथर्वने दुसरा गोल करून 2-1 अशी आघाडी मिळवून दिली.

तिसऱया सामन्यात एमव्ही हेरवाडकरने जी. जी. चिटणीस संघाचा 6-0 असा पराभव केला. अर्जुनने 8, 26, 35 व्या मिनिटाला सलग 3 गोल केले. भोसलेने 16 व 17 व्या मिनिटाला सलग दोन गोल केले. 19 व्या मिनिटाला वरदने 1 गोल केला. चौथ्या सामन्यात ज्ञान प्रबोधन संघाने संत मीरा संघाला 3-1 असा पराभव केला. 27 व्या मिनिटाला ज्ञान प्रबोधनच्या वेदने पहिला गोल करून 1-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱया सत्रात 38 व्या मिनिटाला श्लोकने दुसरा गोल केला तर 39 व्या मिनिटाला विकासने तिसरा गोल करून आघाडी मिळवून दिली. 40 व्या मिनिटाला संत मीराच्या रेहानने गोल करून 1-3 अशी आघाडी कमी केली.

पाचव्या सामन्यात सेंट मेरी संघाने मराठी विद्यानिकेतनचा 7-0 असा पराभव केला. आदित्य चाव्हाणने 22, 24 आणि 25 व्या मिनिटाला 3 गोल केले. अभिषेक सी. ने 17, 34 आणि 56 व्या मिनिटाला 3 गोल तर यश जाधवने 40 व्या मिनिटाला गोल करून 7-0 ची आघाडी मिळवून दिली. सातव्या सामन्यात सेंट झेवियरने अमृता विद्यालयाचा 6-0 असा पराभव केला. 21, 38 आणि 46 व्या मिनिटाला स्पर्श देसाईने 3 गोल, रेहान किल्लेकरने दुसऱया मिनिटाला तर जयदेव सुळगेकरने 45 व्या मिनिटाला गोल करून 6-0 ची आघाडी मिळवून दिली.

सातव्या सामन्यात एमव्हीएमने ज्ञान मंदिरचा 3-0 असा पराभव केला. चौथ्या मिनिटाला अभिषेकने पहिला गोल केला. 9 व्या मिनिटाला तेजसने दुसरा गोल केला. तर 22 व्या मिनिटला अथर्वने तीसरा गोल करून 3-0 ची आघाडी मिळवून दिली. आठव्या सामन्यात सर्वोदय खानापूरने गोमटेशचा 3-0 असा पराभव केला. या सामन्यात 5 व 14 व्या मिनिटाला लीओने सलग 2 गोल केले. तर 16 व्या मिनिटाला निहालने तिसरा गोल करून 3-0 ची आघाडी मिळवून दिली.

गुरुवारचे सामने

  • कनक मेमोरियल वि. भरतेश सकाळी 9 वा.
  • सेंट झेवियर वि. एमव्हीएम सकाळी 10 वा.
  • फिनिक्स पब्लिक वि. एम. व्ही. हेरवाडकर यांच्यात 11 वा.
  • सेंटपॉल्स वि. संत मीरा 12 वा.,
  • केएलएस वि. सेंट मेरीज दुपारी 1 वाजता.
  • ज्ञान मंदिर वि. अमृता विद्यालय दुपारी 2 वा.
  • भरतेश वि. गोमटेश दुपारी 3 वा.
  • सर्वोदय खानापूर वि. कनक मेमोरियल सायं. 4 वा.

Related Stories

मध्यवर्ती बसस्थानकात समस्यांचा डोंगर

Amit Kulkarni

मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेतर्फे 9 जानेवारीला भव्य कुस्ती मैदान

Amit Kulkarni

शांततेला सुरुंग लावण्यासाठी कनसेच्या गुंडांचा पुन्हा गोंधळ

Patil_p

गणाचारी गल्लीत कचऱयाचे साम्राज्य

Amit Kulkarni

मिरज-लोंढा रेल्वेमार्गाचे काम युद्धपातळीवर

Amit Kulkarni

रताळी व्यापाऱयांकडून मनमानी दर

Patil_p
error: Content is protected !!