तरुण भारत

परप्रांतीय व्यापाऱयांविरोधात खानापुरात उद्या बंद

खानापूर : परप्रांतीय व्यापाऱयांकरवी विविध वस्तू व मार्ट वस्तू खानापूरसह  सर्वत्र विकल्या जात आहेत. त्यामुळे स्थानिक व्यापाऱयांना मोठय़ाप्रमाणात फटका बसत आहे. याचा विरोध म्हणून शुक्रवार दि. 26 रोजी सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत सर्व व्यापारी आपापली दुकाने बंद ठेवून त्याचा निषेध करणार आहेत. दवाखाने व औषधांची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत. यासंबंधी तहसीलदार व नगरपंचायत मुख्याधिकाऱयांना निवेदन देण्यात येणार आहे. परप्रांतीय व्यापाऱयांकडून विकल्या जाणाऱया वस्तू विरोधातील विचारविनिमयासाठी बुधवारी सायंकाळी रवळनाथ मंदिरात खानापूर शहरातील सर्व व्यापाऱयांची बैठक बोलविली होती. यावेळी सदरचा निर्णय घेण्यात आला. बैठकीला अनेक व्यापारी उपस्थित होते.

Related Stories

आमटे येथे गणेश जयंत्तीनिमित्त मान्यवरांचा सत्कार

Omkar B

बागलकोटमध्ये दोन, विजापूरमध्ये तिघांना लागण

Patil_p

अमेरिकेच्या निवडणुकीत मराठमोळ्या उद्योजकाचा डंका

Rohan_P

मराठीत परिपत्रके-फलकांसाठी मध्यवर्ती म. ए. समितीचे निवेदन

Amit Kulkarni

हलगा-मच्छे बायपासप्रकरणी पुन्हा बळीराजाला दिलासा

Patil_p

ज्येष्ट वैज्ञानिक अरुण जायण्णावर यांचे निधन

Amit Kulkarni
error: Content is protected !!