तरुण भारत

नवाब मलिकांचा समीर वानखेडेंवर आणखी एक गंभीर आरोप; म्हणाले, “अजून एक फर्जीवाड़ा…”

मुंबई/प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला आहे. नवाब मालिकांची समीर वानखेडेंवरील आरोपाची मालिका सुरूच आहे. मलिक रोज एक वानखेडेंविषयी खुलासे करत आहेत. नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा समीर वानखेडे यांच्या धर्माबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. यावेळी मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या आईच्या मृत्यूपत्राचे दाखले शेअर केले आहेत. यामधील एका दाखल्यात हिंदू तर दुसऱ्यात मुस्लिम असा उल्लेख आहे.

नवाब मलिक यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. मलिक यांनी यावेळी समीर वानखेडे यांच्या आई झहेदा ज्ञानदेव वानखेडे यांच्या मृत्यूचे दाखले शेअर केले आहेत. १६ एप्रिल २०१५ रोजी झहेदा यांचं निधन झाल्याचं या दाखल्यात उल्लेख आहे. दरम्यान नवाब मलिक यांनी यावेळी या दोन्ही दाखल्यांवर उल्लेख असलेल्या धर्माकडे लक्ष वेधलं आहे. एका दाखल्यावर मुस्लिम असा उल्लेख असून दुसऱ्या दाखल्यात हिंदू असा उल्लेक आहे.

मालिकांनी ट्विट करत “अजून एक फर्जीवाड़ा. अंत्यसंस्कारासाठी मुस्लिम आणि सरकारी कागदपत्रांसाठी हिंदू? धन्य आहेत ज्ञानदेव वानखेडे,” असं म्हटलं आहे.

Advertisements

Related Stories

मित्रास काहीतरी सांगितल्याच्या गैरसमजातून एकास मारहाण

Abhijeet Shinde

कडक लॉकडाऊनबाबत मंत्री छगन भुजबळ यांचं महत्त्वाचं वक्तव्य; म्हणाले..

Abhijeet Shinde

पंतप्रधान मोदींनी ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्काराचं नाव बदललं

Abhijeet Shinde

चिंताजनक : महाराष्ट्रात 17,864 नवे बाधित; 87 मृत्यू

Rohan_P

पाकिस्तानात अफगाणी राजदूताच्या मुलीचे अपहरण

datta jadhav

जिल्हाबंदी उल्लंघनप्रकरणी मालगावात 11 जणांवर गुन्हा

Patil_p
error: Content is protected !!