तरुण भारत

बेळगावात तीन अधिकाऱयांना दणका

आरटीओ, हेस्कॉम-सहकार खात्याच्या अधिकाऱयांच्या घरात घबाड

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

बुधवारी बेळगाव जिल्हय़ातील तीन अधिकाऱयांना एसीबीने दणका दिला. आरटीओ, सहकार व हेस्कॉम विभागाच्या तीन अधिकाऱयांच्या घरांवर छापे टाकण्यात आले. या कारवाईत मोठे घबाड उघडकीस आले असून 60 हून अधिक अधिकाऱयांनी या कारवाईत भाग घेतला होता.

महांतेशनगर येथील हेस्कॉमच्या कार्यालयात लाईन मेकॅनिक म्हणून काम करणाऱया नाथाजी पिराजी पाटील यांच्या घरांवर छापे टाकण्यात आले. वैभवनगर येथील नाथाजी यांचे नातेवाईक प्रदीप कृष्णा पाटील हा राहात असलेले घर, मराठा कॉलनी-कंग्राळी बी. के. येथील घर, हेस्कॉमचे कार्यालय आदी ठिकाणी एकाचवेळी छापे टाकण्यात आले.

कंग्राळी बी. के. येथे एक घर, दोन प्लॉट, बांधकाम अवस्थेत असलेली दोन घरे, एक कार, एक दुचाकी, 10 लाख 80 हजार 192 रुपये किमतीचे 239.670 ग्रॅम सोन्याचे दागिने, 1 लाख 18 हजार 988 रुपये किमतीचे 1 हजार 803 ग्रॅम चांदीचे दागिने व सुमारे 20 लाखांच्या गृहोपयोगी वस्तू, 38 हजार 766 रुपये रोकड अशी 1 कोटी 82 लाख 87 हजारहून अधिक माया जमविल्याचे तपासात उघडकीस आले आहे. एसीबीच्या अधिकाऱयांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. घरात लिफ्ट बसविल्याचेही उघडकीस आले असून परदेशी चलनही अधिकाऱयांनी ताब्यात घेतले आहे. तीन अधिकाऱयांच्या घरांवरील कारवाईत मोठय़ा प्रमाणात सोन्या-चांदीचे दागिने, रोकड, जमीन व इतर जागांसंबंधीची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईने सरकारी अधिकाऱयांचे धाबे दणाणले आहेत.

गोकाक येथील आरटीओ अधिकारी सदाशिव रायाप्पा मरलिंगण्णावर यांचे गोकाक येथील घर, कार्यालय, रामदुर्ग तालुक्मयातील कुळ्ळूर येथील घर, रामतीर्थनगर बेळगाव येथे भाडोत्री दिलेले घर, मुधोळ येथील भावाचे घर, कल्लोळ्ळी ता. गोकाक येथील नातेवाईकांच्या घरावर एकाचवेळी छापे टाकण्यात आले आहेत. हुलीकट्टी येथे 22 एकर 50 गुंठे शेतजमीन, बेळगाव येथे एक घर, 31 लाख रुपयांच्या दोन कार, 1 किलो 135 ग्रॅम सोने व 200 ग्रॅम चांदी, 5 लाखांच्या गृहोपयोगी वस्तू, 8 लाख 22 हजार रुपये रोकड अशी एकूण 1 कोटी 87 लाख रुपयांची माया जमविल्याचे उघडकीस आले आहे.

रायबाग येथील सहकार खात्याचे अधिकारी अडिवेसिद्धेश्वर कऱयाप्पा मस्ती यांचे मृत्युंजयनगर-बैलहोंगल येथील घर, त्यांचे मित्र सुरेश सनमनी यांचे घर व रायबाग येथील कार्यालयावर एकाचवेळी छापे टाकण्यात आले. बैलहोंगल येथे 66 लाख रुपये किमतीची दोन घरे, सुमारे 20 लाख रुपये किमतीची बांधकाम अवस्थेतील दोन घरे, 44 लाख 13 हजार रुपये किमतीचे चार भूखंड, 6 दुचाकी, 20 लाख 70 हजार रुपये किमतीच्या चार कार, 263.08 ग्रॅम सोने, 95.16 ग्रॅम चांदी, बँक डिपॉझिट्स, विमा, शेअर्स, गृहोपयोगी वस्तू, 1 लाख 10 हजार 270 रुपये रोकड अशी 1 कोटी 24 लाख 74 हजार 410 रुपये किमतीची मालमत्ता जमविल्याचे उघडकीस आले आहे.

एसीबीचे पोलीस अधीक्षक बी. एस. नेमगौडा यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपअधीक्षक करुणाकर शेट्टी, ए. एस. गुदीगोप्प आदींसह सुमारे 60 हून अधिक अधिकाऱयांचा समावेश असलेल्या पथकाने एकाचवेळी छापे टाकून ही कारवाई केली आहे.

Related Stories

मान्सून: कोडगूमध्ये रेड अलर्ट जरी

Abhijeet Shinde

किणयेनजीक ट्रकमधील साहित्याची चोरी

Patil_p

कुडचीत आजपासून तीन दिवस पूर्ण बंद

Patil_p

दक्षिणमुखी मारुतीला कोरोना दूर करण्यांसाठी गाऱहाणे

Amit Kulkarni

मध्यवर्ती बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ समस्या

Patil_p

भारतीय वंशाची गीतांजली ठरली ‘किड ऑफ द इयर’

Patil_p
error: Content is protected !!