तरुण भारत

वेतवडे म्हैस चोरीप्रकरणी दोन आरोपींना अटक

म्हासुर्ली/प्रतिनिधी

धामणी खोऱ्यातील वेतवडे पैकी खामणेवाडी (ता.पन्हाळा) येथील विलास शंकर दळवी यांच्या मालकीच्या चोरीस गेलेल्या म्हैशी चोरी प्रकरणी कळे पोलिसांनी प्रशांत विलास कांबळे रा.सुळे, व दिनकर नानू कांबळे रा.कोदवडे (ता.पन्हाळा) या दोघांना अटक करत न्यायालयात हजर केले असता त्यांना १४ दिवसाची पोलिस कोठडी मिळालीी आहे.

सदर चोरी प्रकरणी कळे पोलिस तपास करत असताना साक्षीदार महेश सरदार कांबळे रा.वेतवडे व हमीद अल्लाबक्ष बेपारी या दोघांनी दिलेल्या माहितीनुसार चोरीस गेलेली म्हैस दोन दिवसापूर्वी ताब्यात घेण्यात आली होती. तसेच पुढील तपासामध्ये प्रशांत विलास कांबळे रा. सुळे व दिनकर नानू कांबळे रा.कोदवडे या दोघांनी म्हैस चोरी केल्याचे निष्पन्न झाले होते.

त्यानंतर दोन्ही आरोपी फरार झाले होते. मात्र कळे पोलिसांनी कसून शोध घेऊन दोघांना ताब्यात घेत त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायमूर्ती विनोद खुळपे यांनी त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद सुर्वे यांच्या सूचनेनुसार पो.हे.कॉ एस. व्ही. पाटील, पोलीस नाईक सरदार भोसले यांनी तपास करत आरोपींना पकडण्यात यश मिळविले.

Advertisements

Related Stories

कोल्हापूर जिल्हय़ात आज कोरोनाचे 23 बळी

Abhijeet Shinde

अखेर बॉक्समधील गुळावर तोडगा-सौदे पूर्ववत

Sumit Tambekar

कोल्हापूर : आशा कर्मचाऱ्यांचा उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Abhijeet Shinde

कोल्हापूर : तीस लाखाची फसवणूक करणाऱ्या तिघांना अटक

Abhijeet Shinde

संगणक परिचालकांना लवकरच ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारी म्हणून नियुक्त करू – हसन मुश्रीफ

Abhijeet Shinde

सरसकट कर्जमाफी होत नाही तोपर्यंत सेवा संस्थांना टाळेच

Abhijeet Shinde
error: Content is protected !!