तरुण भारत

वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी

18 जागेसाठी 100 पेक्षा जास्त अर्ज दाखल, 4451 मतदार

कुंभोज/प्रतिनिधी

Advertisements

वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी कुंभोज, नेज, हिंगणगाव, नरंदे, लाटवडे, भेंडवडे, वठार परिसरातून ग्रामपंचायत व संस्था गटातून निवडणूक लढवण्यासाठी मोठ्याप्रमाणात इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. तर कुंभोज जिल्हा परिषद मतदार संघातून जवळजवळ 25 पेक्षा अर्ज वेगवेगळ्या गटातून दाखल झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे. वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकूण 18 जागांपैकी संस्था गटासाठी 11 जागा, ग्रामपंचायत गटासाठी 4 जागा, व्यापारी गटासाठी 2 जागा व हमाल तोलाई गटासाठी 1 जागा अशा एकूण 18 जागांसाठी निवडणूक होणार आहे. हातकणंगले तालुक्यातील एकूण 60 गावांपैकी वडगाव कृषी उत्पन्न बाजार समिती साठी 4451 इतकी मतदार नोंदणी आहे. सर्वात कमी मतदान हमाल तोलाई गटासाठी 58 इतके आहे.

परिणामी कुंभोज परिसरात महाविकासआघाडी बरोबरच आवडे, महाडिक, कोरे गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना गटाचे मोठ्या प्रमाणात वर्चस्व असून महाविकासआघाडी बरोबरच सध्या महाडिक, कोरे, आवडे गटातून अनेक इच्छुकांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. परिणामी कुंभोज येथे संस्था गट व ग्रामपंचायत गटातून दोन जणांना उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

परिणामी गेल्या पंचवीस वर्षापासून कुंभोज येथे वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रतिनिधीत्व महादेवराव महाडिक व आमदार विनय कोरे, आवाडे यांच्या माध्यमातून मिळाले आहे. संस्था गटातून तसेच हमाल तोलाई गटातून सदर परिसराला नेतृत्व मिळत गेले आहे. परिणामी यावेळी ग्रामपंचायत व संस्था गटातून मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले असून महाविकासआघाडी आवडे, कोरे व महाडिक गटातून नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वसामान्य मतदाराचे लक्ष केंद्रित झाले आहे. परिणामी गेल्या पंचवीस वर्षात वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच चुरस लागल्याचे चित्र दिसत असून कालपर्यंत 17 जागांसाठी 100 पेक्षा जास्त अर्ज दाखल झाले होते. तसेच आज सायंकाळपर्यंत आणखी पन्नास अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. उमेदवार निवडताना नेत्यांना मात्र तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

प्रत्येक पक्षाचे गटनेते आपल्या कार्यकर्त्याला कशी संधी मिळेल यांचा प्रयत्न करत असल्याचे चित्र सध्या हातकणंगले येथे दिसत असून अर्ज भरल्यानंतर होणाऱ्या बैठकीतच कोण उमेदवार असेल यावर चर्चा होणार आहे. परिणामी सर्वच उमेदवार मी कसा योग्य आहे हे दाखवून देण्याचे गटनेत्यांनी प्रयत्न करत असून सध्या परिसरातील आमदार, खासदार यांच्या दरात इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र दिसत आहे.

Related Stories

मनपाडळेत माळरानावर अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला

Abhijeet Shinde

अज्ञात जनावराकडून तीन शेळ्या, एका वासराचा फडशा

Abhijeet Shinde

शहरात २ वेश्या अड्डयांवर छापा, ३ अटक

Abhijeet Shinde

कोल्हापूर : शिरोळमधील शतायु हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी यंत्रणा तयार

Abhijeet Shinde

गोकुळची गरज ओळखूनच जागा खरेदी – चेअरमन विश्वास पाटील

Abhijeet Shinde

कोल्हापूर : शिरोली औद्योगिक वसाहत येथे ट्रकने घेतला पेट

Abhijeet Shinde
error: Content is protected !!