तरुण भारत

टेंम्पोच्या धडकेत सोनगेतील तरुण ठार

मुरगूड / वार्ताहर

सोनगे ता. कागल येथे मुरगुड – निपाणी रस्त्यावर भाजीपाला वाहतूक करणाऱ्या टेंपोने धडक दिल्याने पादचारी जागीच ठार झाला. रामचंद्र उर्फ किरण बाळासो वडेर (वय 3८ वर्षे ) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मुरगूड पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.

याबाबत माहिती अशी, किरण वडेर सकाळी 9.15 वा. च्या सुमारास शेतीकामासाठी रस्त्याच्या डाव्या बाजुने पायी जात होता. मूरगूड़कडे येणाऱ्या एम एच 12 जे एफ 0919 या भाजीपाला वाहतुक करणाऱ्या टेम्पोने किरणला जोरात धडक दिली. या धडकेत टेंम्पोने किरणला तब्बल ५o ते ६o फुट फरफट नेल्याने किरणचा जागीच मृत्यू झाला. ही धडक इतकी भीषण होती की, डोक्याला मार लागल्यानंतर किरणचे केस टेम्पोच्या काचेमधे अडकले होते. वर्षभरापूर्वी किरणच्या वडीलांचे तर 6 महिन्यापूर्वी आईचे निधन झाले होते. अशिक्षीत किरण गावामधे मिळेल ते काम करुन उदरनिर्वाह करत होता. त्याच्या अपघाती निधनामुळे सर्वत्र हळहळ होत आहे.

Advertisements

Related Stories

कोरोनावर मात व अर्थव्यवस्था रुळावर आणणं हीच दोन मोठी आव्हानं; उपमुख्यमंत्री अजित पवार

Abhijeet Shinde

चंदूरातील आत्महत्या हनीट्रॅपमधून ?

Abhijeet Shinde

‘प्रकाश’ ची 30 दिवसांची झुंज अखेर व्यर्थ

Abhijeet Shinde

‘मराठा आरक्षणावर सरकारचा अभ्यास नाही’

Abhijeet Shinde

‘सारथी’चे उपकेंद्र सुरु, ‘गरजवंतांचे आयुष्य घडवणार’

Abhijeet Shinde

चरस विक्रीसाठी आलेला रेकॉर्डवरील नेपाळी गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात

Abhijeet Shinde
error: Content is protected !!