तरुण भारत

कनिष्ठ अभियंत्याच्या घरातील ड्रेनेज पाईपमधून निघाले लाखो रुपये

गुलबर्गा/प्रतिनिधी

कर्नाटकातील गुलबर्गा येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं पीडब्ल्यूडी कनिष्ठ अभियंता यांच्या घरावर छापा टाकला. या अभियंत्याच्या घरातून कोट्यवधी रुपयांची बेकायदा मालमत्ता जप्त करण्यात आलीय. यादरम्यान छापेमारीचा व्हिडिओ आता समोर आलाय. या व्हिडिओमध्ये छापा टाकणारे अधिकारी अभियंत्याच्या घरातील ड्रेनेज पाईपमधून पैसे काढताना दिसत आहेत. पाइपलाइनमधून एवढा पैसा बाहेर आल्याचे पाहून अधिकाऱ्यांचे डोळे चक्रावले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कनिष्ठ अभियंत्या शांता गौरा बिरदार यांच्या निवासस्थानावर छापा टाकला, ज्यामध्ये बाथरूमला लागून असलेल्या घराच्या ड्रेनेज पाईपमध्ये १३.५० लाख रुपयांच्या चलनी नोटांचे बंडल सापडले. त्यांच्याकडून घराच्या छतावरून १५ लाखांची रोकडही जप्त करण्यात आली. या कनिष्ठ अभियंत्याच्या घरातून एकूण ५५ लाखांहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे.

पीडब्ल्यूडी विभागाच्या अधिकाऱ्याच्या निवासस्थानाच्या पाईपलाईनमध्ये रोख रक्कम लपवण्यात आल्याचे सूत्रांकडून एसीबी अधिकाऱ्यांना सांगण्यात आले होते. अधिकाऱ्यांनी छापा टाकून एका प्लंबरला बोलावून पाइपलाइन उघडली आणि आत लपवलेल्या नोटा बाहेर काढल्या. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये अधिकारी आणि प्लंबर पाईपचे काही भाग वेगळे करताना दिसत आहेत. या पाईप्समधून पुन्हा नोटा काढण्यात आल्या.

Advertisements

Related Stories

पत्नीने धोका देताच अन्य महिलांचा काढला काटा

Patil_p

पंतप्रधान मोदींचा ब्लॉग होतोय लोकप्रिय

Patil_p

आयएनएस सुमेधाने 13 जणांना वाचविले

Patil_p

मध्य प्रदेश : मंत्री अरविंद भदौरिया यांना कोरोनाची बाधा

Rohan_P

बिहार निवडणूक : महाआघाडीचे घोषणापत्र जाहीर

datta jadhav

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मेंढय़ा विक्रीला अल्प प्रतिसाद, मेंढपाळ चिंताग्रस्त

Rohan_P
error: Content is protected !!