तरुण भारत

मिरज रेल्वे प्रशासनाकडून अतिक्रमणे जमीनदोस्त; घरे व झोपड्या हटविल्या

प्रतिनिधी / मिरज

मिरजेतील रेल्वे स्थानकालगत रेल्वेच्या जागेतील झोपड्या व घरे जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या पोलिस बंदोबस्तात हटविण्यात आली. रेल्वेच्या जागेत सुमारे ४० वर्षापासून असलेली वसाहत जमीनदोस्त करण्यात आली.

पुणे-मिरज-लोंढा रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण व दुहेरीकरणाचे काम सुरु आहे. रेल्वे स्थानकात हैदरखान विहीरीजवळ असलेल्या या जागेत नवीन रेल्वेमार्ग व रेल्वे वॉशिंग शेड उभारण्यात येणार आहे. झोपड्या व घरे रिकामी करण्यासाठी गेली दोन वर्षे येथील रहिवाशांना वारंवार नोटीसा देण्यात आल्या होत्या. मात्र घरे हटविण्यास नागरीक विरोध करीत असल्याने रेल्वे प्रशासनाने रेल्वे सुरक्षा दल, रेल्वे पोलिस, स्थानिक पोलिसांच्या मदतीने आज ही कारवाई करुन सुमारे ४० वर्षापासून असलेली वसाहत हटविण्यात आली.

Advertisements

Related Stories

विहापूर येथे किरकोळ कारणावरुन झालेल्या मारहाणीत दोघांचा खून

Abhijeet Shinde

सांगली : कुपवाडमध्ये लवकरच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल

Abhijeet Shinde

आटपाडीत तलाठय़ासह दोघांना अटक

Patil_p

कोरोना उपचार वस्तूंवर जीएसटी दर कपात

Abhijeet Shinde

सांगली : इराणचा शाहीन सादेह ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता

Abhijeet Shinde

शेतकरी बँकेची नोंदणी रद्द होणार, अवसायकांना मुदतवाढ नाकारली

Abhijeet Shinde
error: Content is protected !!