तरुण भारत

योगी सरकारचा मोठा निर्णय; महापुरुषांच्या जयंती आणि महाशिवरात्रीला मांस विक्रीवर बंदी

ऑनलाईन टीम/तरुण भारत

उत्तर प्रदेशातील योगी सरकारने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महापुरुषांच्या जयंती आणि शिवरात्रीनिमित्त राज्यात कत्तलखाने आणि मांसाची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याच अनुषंगाने २५ नोव्हेंबर रोजी सिंधी समाजाचे संत टीएल वासवानी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरातील कत्तलखाने आणि मांसाची दुकाने बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

दरम्यान, उत्तर प्रदेशात योगी सरकारने महापुरुषांच्या जयंती आणि शिवरात्रीनिमित्त राज्यात सर्वत्र मांस विक्रीवर बंदी गळण्याचे निर्देश जारी केले आहेत. नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव रजनीश दुबे यांनी यासंदर्भात सर्व जिल्ह्यांचे विभागीय आयुक्त आणि जिल्हा दंडाधिकारी यांना आदेश जारी करताना त्याचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, याआधी मुख्यमंत्री योगींनी मथुरा येथील श्रीकृष्णाच्या जन्मस्थानाचा १० चौरस किमी क्षेत्र तीर्थक्षेत्र म्हणून घोषित केले होते. त्यानंतर तीर्थक्षेत्र परिसरात मद्य व मांसविक्रीवर बंदी घालण्यात आली होती. ब्रजमध्ये येणाऱ्या लाखो भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन योगी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

Advertisements

Related Stories

जगभरात 51.94 लाख कोरोनाबाधित

datta jadhav

संसदेत गदारोळ घालणाऱ्या तृणमूलच्या सहा खासदारांचं निलंबन

Abhijeet Shinde

”1 मे पासून राज्यात प्राथमिक स्तरावर लसीकरण सुरू होण्याची शक्यता, पण…”

Abhijeet Shinde

कोरोनाचा कहर : आता ‘या’ राज्यातही विकेंड कर्फ्यू

Rohan_P

रशियाची ‘ती’ लस ऑगस्ट मध्यापर्यंत होणार उपलब्ध

datta jadhav

वानखेडेंची याचिका मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळली

datta jadhav
error: Content is protected !!