तरुण भारत

शिक्षकांचे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठीचे शुल्क रद्द करावे – आ. जयंत आसगांवकर

सांगरूळ / प्रतिनिधी

शिक्षकांच्या साठी असलेले वरिष्ठ व निवड श्रेणीचे ऑनलाईन प्रशिक्षणासाठी आकारण्यात येणारे शुल्क रद्द करावे अशी मागणी शिक्षक आमदार प्रा जयंत आसगावकर यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडे केली आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या परिपत्रकामध्ये राज्यातील वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी पात्र शिक्षकांना २३नोव्हेंबर ते २३ डिसेंबर २०२१ पर्यंत ऑनलाइन स्वरूपात वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण देण्यासाठी ऑनलाईन स्वरूपात माहिती भरण्याचे आवाहन केले आहे . या प्रशिक्षणासाठी रुपये दोन हजार इतके शुल्क आकारले जाणार आहे तसा उल्लेख या परिपत्रकात मुद्दा नंबर १४ मध्ये नमुद केला आहे.

शासनामार्फत शिक्षकांच्या साठी होणारी सर्वच सेवांतर्गत प्रशिक्षणे निशुल्क होतात. यापूर्वी कधीही शिक्षकांना पैसे देऊन प्रशिक्षण घ्यावे लागले नाही . या निर्णयामुळे राज्यातील शिक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे हे प्रशिक्षण मोफत असावे अशी भूमिका शिक्षक वर्गातून होत आहे .तरी शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने निर्गमित केलेल्या परिपत्रकांमध्ये मुद्दा क्रमांक १४ रद्द करून या शिक्षकांना प्रशिक्षण निशुल्क करावी अशी मागणी आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडे केली आहे.

Advertisements

Related Stories

लखनऊमध्ये एटीएसने दोन दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या

Abhijeet Shinde

सातारा जिल्हा परिषद अध्यक्षांना कोरोना, आज बाधितांचा आकडा 188च्या पुढे

Abhijeet Shinde

साताऱयात चोरटय़ाकडून 50 मोबाईल हस्तगत

Patil_p

कराडमध्ये सर्वच रस्त्यांवर सम-विषम पार्किंगचा विचार

Amit Kulkarni

नगराध्यक्षांनी रूग्णालयातुन घेतला शहराचा आढावा

Patil_p

पाटणे फाटा येथे मोटरसायकल अपघातात एक ठार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!