तरुण भारत

वेदान्ता समूहाचे शून्य कार्बन उत्सर्जनाचे ध्येय

आगामी 2050 पर्यंत ध्येय साध्य करण्याचे संकेत

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisements

वेदान्ता समूहाने नैसर्गिक संसाधन क्षेत्रामध्ये पर्यावरण, सामाजिक उपक्रमासाठी सर्वंकषपणे प्रयत्न करणार असल्याची घोषणा नुकतीच केली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार वर्ष 2050 पर्यंत कंपनी निव्वळ स्वरुपात शून्य कार्बन उत्सर्जनाचे ध्येय प्राप्त करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

वेदान्ताने पर्यावरण, सामाजिक उपक्रम तसेच कंपनीच्या कामावर समूहाची वचनबद्धता जपणार असल्याचे नमूद केले आहे. यामुळे येत्या दहा वर्षांमध्ये शून्य उत्सर्जनाच्या दिशेने वेगाने कार्यरत होण्याची योजना आखणार असल्याचे सांगितले असून याकरीता पाच अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचा संकल्प कंपनीने निश्चित केला आहे.

कंपनी विविध नैसर्गिक संसाधन कंपनीच्या स्वरुपात वेदान्ता व्यवसायात जबाबदारीने वृद्धी प्राप्त करण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचेही वेदान्ताच्या संचालिका प्रिया अग्रवाल यांनी स्पष्ट केले आहे.

Related Stories

गुगल लहान-मध्यम कंपन्यांना 7.5 कोटी डॉलर्सचा निधी देणार

Amit Kulkarni

सोने आयात सहा पटीहून अधिक वाढली

Patil_p

बँकिंगच्या समभाग विक्रीमुळे बाजारात घसरण

Patil_p

अदानी यांचे समभाग दोन दिवसांपासून घसरणीत

Patil_p

जागतिक संकेतामुळे सेन्सेक्समध्ये 600 अंकांची वाढ

Patil_p

बाजार अंतिम दिवशी घसरणीसह बंद

Patil_p
error: Content is protected !!