तरुण भारत

आदिवासींमधील ‘लिव्ह इन रिलेशन’

लग्न न करता एकमेकांबरोबर राहण्याची सोय म्हणून लिव्हिंग रिलेशीपकडे पाहिले जात आहे. ही पद्धती आधुनिक काळातील असल्याचा समज अनेकांचा आहे. काही लोक तर या पद्धतीकडे विवाह संस्थेचा पर्याय म्हणूनही पाहू लागले आहेत. तथापि ही पद्धत आधुनिक नसून पुरातन काळापासून आदिवासी समाजामध्ये प्रचलित असल्याचे संशोधनात दिसले आहे. तसेच ही पद्धत पाश्चिमात्य देशाकडून येथे ही आलेली नसून चक्क देशी आहे असेही दिसून येते. मध्यप्रदेशतील अनेक आदिवासी जमातीमध्ये ही पद्धती ‘ढुकू’ या नावाने ओळखली जाते. झारखंडमधील गुमला, खुंटी, बसिया, घागरा, पालकोट, चटकपूर, टोर्पा, सिमडेगा आणि मनातू आदी जिल्हय़ांमधून ती शेकडो वर्षा पूर्वीपासून आहे. ढुकू हा शब्द ढुकना या हिंदी शब्दापासून जन्मल्याचे सांगितले जाते. ढुकना याचा अर्थ गृहप्रवेश असा आहे. लग्नाविना एखादी महिला कोणत्या तरी पुरुषाच्या घरात राहात असेल तर अशा महिलेला ढुकनी महिला असे म्हटले जाते. लग्न करण्याचा खर्च परवडत नाही म्हणून कित्येक महिला ढुकनी बनणे पसंद करतात. लग्नात संपूर्ण गावाला जेवण देण्याची प्रथा आहे. ती गरीब परिवारांना परवडत नाही. म्हणून खर्च टाळून वैवाहिक जीवनाचा आनंद घेण्यासाठी ही प्रथा बऱयाच काळापासून प्रचलित असल्याचे सांगितले जाते. अशाप्रकारे एकमेकांसह आयुष्य काढून वयाच्या 70 वर्षानंतर रितसर विवाह केलेली अनेक जोडपी मध्यप्रदेश, छत्तीसगड, आणि झारखंडच्या भागांमध्ये दिसून येतात.

Related Stories

जागतिक परिचारिका दिन! राहुल गांधी म्हणाले…

Rohan_P

संकष्टी चतुर्थीला मंदिराबाहेरुनच ‘दगडूशेठ’ गणपतीचे दर्शन

Rohan_P

श्री महालक्ष्मी देवीला दसऱ्याच्या निमित्ताने सोन्याची साडी

Rohan_P

शिवप्रेमींनी पारंपरिक अभिषेकाने साजरा केला शिवराज्याभिषेक सोहळा

Rohan_P

कौतुकास्पद! प्रियांकाचे ‘अनफिनिश्ड’ हे पुस्तक अवघ्या 12 तासात नंबर वन वर

Rohan_P

‘ग्लोबल वॉर्मिंग’चे महाआव्हान

Patil_p
error: Content is protected !!