तरुण भारत

भगवान वामनाचे पहिले पाऊल…

राजस्थानातील बान्सवाडा जिल्हातील प्रयाग नामक क्षेत्र अनेक ऐतिहासिक मान्यतांचे स्थान म्हणून ओळखले जाते. याच स्थानी भगवान विष्णूचा अवतार मानल्या जाणाऱया वामनाचे पहिले पाऊल पडले. असे सांगितले जाते. (वामन आणि बळीराजा यांची गोष्ट सवश्रृत आहे. वामनाने बळीराजाकडे तीन पावले भूमी मागितली होती. त्यापैकी हे पहिले पाऊल होते, अशी भावना आहे.) याच स्थानी संशोधन करताना एक अतिप्राचीन दगडी प्रतिमा आढळून आली आहे. ती संत मावजी यांची असल्याचे म्हटले जाते. याच ठिकाणी शिवलिंग तसेच अनेक पौराणिक वास्तुंचे अवशेष मिळाले आहे. हे स्थान बळीराजाची यज्ञभूमी असल्याचेही मानण्यात येते. ही प्रतिमा सापडल्यामुळे वामन आणि बळीराजा यांच्या अस्तित्वा संबंधीच्या कथांना बळकटी मिळते असे सांगण्यात आले आहे. वामन किंवा संत माऊजी यांची ही प्रतिमा या भागानजीकच्या नदीतील खोलवर डोहात सापडली. या स्थानी सापडणाऱया अनेक ऐतिहासिक वस्तूंमुळे हा भाग रहस्यमय मानला जातो. आता अधिकाधिक संख्येने येथे पुरातत्व संशोधक येत असून उत्खनन मोठय़ा प्रमाणात हाती घेण्यात आले आहे. अनेक ऐतिहासिक आणि पौराणिक कथांचे पुरावे येथे सापडू शकते., यावरून भारतीय संस्कृतीचे अस्तित्व सिद्ध करणे आणि त्याविषयी अधिक माहिती मिळणे सुलभ होईल असे म्हटले जाते.

Related Stories

श्री महालक्ष्मी देवीला दसऱ्याच्या निमित्ताने सोन्याची साडी

Rohan_P

नवरात्री सोहळय़ाचे प्रांतिक रंग

Patil_p

भारतीय सैनिकांनी काश्मिरमध्ये केली ‘दगडूशेठ’ गणपतीची स्थापना

Rohan_P

विराट – अनुष्काने एक लहान मुलाच्या उपचारासाठी जमा केले 16 कोटी

Rohan_P

दरवर्षी 65 कोटींचे उत्पन्न मिळवून देणारी ‘मछली’

Amit Kulkarni

कोरोना योद्ध्यांच्या हस्ते यंदा श्री महालक्ष्मी मंदिरात प्रतिष्ठापना

Rohan_P
error: Content is protected !!