तरुण भारत

शिवेंद्रराजे हेच माझ्या पराभवाला जबाबदार

आमदार शशिकांत शिंदे यांचा थेट आरोप : माझ्या विरोधात मोठे षडयंत्र केले मनात आणलं असतं तर मतदारांना तिथून उचललं असतं

प्रतिनिधी /सातारा

Advertisements

माझ्या मनात जे असते तेच ओठावर असते, शिवेंद्रराजेंसारखे नसते. मी गावागावात बैठका घेतल्या. मतदारांचा मला पाठींबा मिळत होता तर ह्यांनी मतदानाच्या आदल्या दिवशी गावागावात बैठका घेऊन ऊस नेणार नाही अशी धमकी दिली. कोणाला वांगडेंच्या कॉलेजवर नोकरी लावण्याचे अमिष दाखवले. कोणाला कशाचे अमिष दाखवले तर कोणावर दादागिरी केली. माझ्या पराभवाला भाजपाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले हेच जबाबदार आहेत, यामागे मोठे षडयंत्र आहे, असा घणाघाती आरोप आमदार शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला.

शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जावली तालुक्यातील कार्यकर्त्यांचे भाऊगर्दी उपस्थित होती. शशिकांत शिंदे म्हणाले,  पवारसाहेबांनी, अजितदादांनी, रामराजेंनी सांगूनही शिवेंद्रराजेंनी माघार घेतली नाही. विधानसभेच्या निवडणुकीवेळी प्रभाकर देशमुख आणि माझा पराभव झाला. मी सामान्य राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. त्यावेळी मी पराभव मनापासून स्वीकारला आणि आताही दीपक पवार यांची स्वतःची चार मते होती. रामराजेंच्यासोबत बैठक घेतली तेव्हा 27 मते होती. मी सरळ मनाचा राजकारणी आहे. मनात एक तोंडावर एक असे नव्हते. एवढीच माझी चूक झाली. माझ्याकडे 17, 18 मते होती ती 24 पर्यंत नेली हा माझा नैतिक विजय आहे.

विजयी उमेदवारासोबत जे मतदार होते त्यांच्यापर्यंत गोव्यापासून तिरुपतीपासून बालाजीपर्यंत पोहचलो होतो. मी मनात आणले असते तर त्या सगळय़ांना उचलले असते. परंतु तसे काम केले असते तर माझ्यावर ठपका पडला असता. पॅनेलच्या चौकटीबाहेर काम केले म्हणून. माझाच विश्वासघात केला. ज्यांनी ती जबाबदारी घेतली होती त्यांनी रांजणेचा अर्ज मागे घेण्याचा प्रयत्न केला नाही. चर्चेसाठी बैठका लांबवत राहिले तेव्हाच माझ्या ध्यानात आले. मी जावलीत गावागावात बैठका घेत होतो. जावलीतील जनतेचा पाठींबा मिळत होता. हेच ओळखून शिवेंद्रराजेंनी जावलीतील त्याच गावांमध्ये बैठका घेऊन ऊस नेणार नाही अशी धमकी दिली. काहींना वांगडे यांच्या कॉलेजवर लावण्याची अमिष दाखवले तर काहींना धमकी दिली. माझ्या पराभवाला आमदार शिवेंद्रराजे हेच जबाबदार आहेत. यामागे मोठे षडयंत्र आहे, असा आरोप त्यांनी शिवेंद्रराजेंच्यावर केला.

Related Stories

सातारकरांनो, सावध व्हा, नियम पाळा

Patil_p

पसरणी घाटात बस उलटून पंधरा जखमी

Abhijeet Shinde

सातारा : कोरोनाने एका दिवसात घेतले ६ बळी

Abhijeet Shinde

कुंटणखाना महिला चालकासह साथीदार गजाआड

Patil_p

एक पत्र मराठा युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मोहिमेचा कराडला प्रारंभ

Patil_p

कोयना नदीत आढळले तीन बॉम्ब

Patil_p
error: Content is protected !!