तरुण भारत

17 दिवसानंतर कराडला पहिली एस.टी.आली

सांगली-कराड बसची एक फेरी, प्रशासन व वर्कशॉपमधील 33 कर्मचारी कामावर हजर

वार्ताहर /कराड

Advertisements

एसटी कर्मचाऱयांचे आंदोलन सुरू असले तरी गुरूवारी आमदार सदाभाऊ खोत व गोपीचंद पडळकर यांनी आझाद मैदानावरील आंदोलन मागे घेतल्याचे जाहीर केल्यानंतर तब्ब्ल 17 दिवसांनी सांगली-कराड ही पहिली एस. टी. बस कराडला आली. यावेळी संतप्त झालेल्या आंदोलकांनी टाळय़ा वाजवून संताप व्यक्त केला. तर गुरूवारी प्रशासन व वर्कशॉप विभागातील एकूण 33 कर्मचारी कामावर हजर झाल्याचे आगारप्रमुख विजय मोरे यांनी सांगितले. जोपर्यंत विलीनीकरण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची शपथ कर्मचाऱयांनी खाल्ली.

कराड आगारातील कर्मचाऱयांनी 18 दिवसांपासून बसस्थानकाच्या प्रवेशद्वारात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आंदोलन सुरू झाल्यापासून कराड बसस्थानकातून एकही एस. टी. बाहेर पडली नाही. बाहेरून एकही एस. टी. बस कराडला आली नाही.

गुरूवारी आमदार सदाभाऊ खोत व आमदार गोपीचंद पडळकर यांनी आझाद मैदानावरील आंदोलन मागे घेतल्याचे जाहीर केल्यानंतर सांगली आगाराची सांगली-कराड ही पहिली एस. टी. कराड बसस्थानाकात दाखल झाली. बसस्थाकाच्या प्रवेशद्वारात एस.टी. येताच आंदोलक कर्मचाऱयांनी घोषणाबाजी करत व टाळय़ा वाजवून आपला संताप व्यक्त केला. कराड आगारात गुरूवारी प्रशासन विभागातील 28 व वर्कशॉपमधील 5 असे एकुण 33 कर्मचारी कामावर हजर झाले. वर्कशॉपमधील कर्मचाऱयांकडून एस.टी.च्या काचांना जाळया बसवण्याचे काम करण्यात येत असल्याचे आगारप्रमुख विजय मोरे यांनी सांगितले. अद्यापही एकही चालक अथवा वाहक कामावर हजर झाला नाही. त्यामुळे कराड आगारातून एकही एसटीची फेरी होऊ शकली नाही.

दरम्यान राज्यभरात काही ठिकाणी आंदोलक एस.टी.कर्मचाऱयांत फुट पडल्याचे पाहावयास मिळत असल्याने कराड आगारातील कर्मचाऱयांनी संताप व्यक्त केला.

कराड आगाराचे दीड कोटीचे नुकसान

कराड आगाराच्या माध्यमातून दररोज सुमारे 8 लाख रूपयांचे उत्पन्न मिळते. मात्र जवळपास 18 दिवसांपासून एस. टी. कर्मचाऱयांचे आंदोलन सुरू असल्याने आत्तापर्यंत कराड आगाराचे 1 कोटी 44 लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. एस. टी. प्रशासनाबरोबबरच ग्रामीण भागातील गोरगरीब प्रवाशांचे प्रचंड प्रमाणात हाल व नुकसान होत आहे. त्यामुळे प्रशासन व एस. टी. कर्मचाऱयांनी संवाद साधून आंदोलनावर तोडगा काढण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे.

Related Stories

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कोरेगावात प्रांताधिकार्यांची धडक कारवाई

Patil_p

घंटा वाजली अन् मुलांचे चेहरे खुलले…

Patil_p

पत्रकारांना केरोना लस देण्याबाबतचा प्रस्ताव पाठवणार

Amit Kulkarni

छत्रपती ही शिवाजी महाराजांची खरी उपाधी

Patil_p

सेनेच्या माजी जिल्हा प्रमुखांना पालिकेत धक्काबुक्की

Patil_p

सातारा : वाई कृषी उत्पन्न बाजार समिती दोन दिवस बंद

Abhijeet Shinde
error: Content is protected !!