तरुण भारत

51 जणांवर सेवा समाप्तीची कारवाई

आतापर्यंत 34 एसटी कर्मचाऱयांचे निलंबन  : संप सुरूच

प्रतिनिधी / कणकवली:

Advertisements

शासनाने पगारवाढ जाहीर केली असली, तरीही शासनात विलिनीकरणासाठी एसटी कर्मचाऱयांचे कामबंद आंदोलन सुरूच आहे. दरम्यान, याप्रकरणी सिंधुदुर्ग विभागातील 34 कर्मचाऱयांना आतापर्यंत निलंबित करण्यात आले असून 51 कर्मचाऱयांची सेवा समाप्ती करण्यात आल्याची माहिती एसटीच्या सूत्रांकडून देण्यात आली.

एसटी कर्मचाऱयांनी सुरू केलेले कामबंद आंदोलन सिंधुदुर्गमध्ये सलग 18 व्या दिवशी सुरू आहे. त्यामुळे शाळकरी मुले, सर्वसामान्यांना मोठय़ा अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाने 41 टक्के पगारवाढ जाहीर केली, तरीही शासन सेवेत विलिनीकरणासाठी कामगार मागणीवर ठाम राहिले आहेत. त्यामुळे गुरुवारीही जिल्हय़ातून एकही एसटी बस धावू शकली नव्हती. सिंधुदुर्ग विभागात आतापर्यंत 159 कर्मचारी कामावर हजर झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, सिंधुदुर्ग विभागातील आतापर्यंत 34 कर्मचाऱयांचे निलंबन करण्यात आले आहे. 24 तासांत कामावर हजर होण्यासंदर्भात 152 रोजंदारीवरील कर्मचाऱयांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. यापैकी 51 कर्मचाऱयांची सेवा समाप्ती करण्यात आली असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

Related Stories

घटनास्थळी सापडले दत्तारामचे घडय़ाळ

NIKHIL_N

एसटी कर्मचाऱ्यांसाठीचे “जेलभरो” स्थगित- मंगेश तळवणेकर

Ganeshprasad Gogate

श्री देवी सातेरी हायस्कूल वेतोरे येथे गुणगौरव समारंभ संपन्न

Ganeshprasad Gogate

न्यायालयाच्या निर्णयाकडे संपकरी एसटी कर्मचाऱयांचे लक्ष

Patil_p

वायंगणीतील देवशेतीला प्रारंभ

NIKHIL_N

रात्रीच्या निरव शांततेत ‘जीवघेणा लपंडाव’

NIKHIL_N
error: Content is protected !!