तरुण भारत

सातारा जिल्हा परिषदेमध्ये लसीकरण झालेल्याच नागरिकांना प्रवेश

प्रतिनिधी /सातारा

 सातारा जिल्हा परिषदेमध्ये विविध विभागामध्ये जिल्हय़ातुन नागरिकांची मोठय़ा प्रमाणात वर्दळ सुरू असते. कोविड-19 च्या अनुषंगाने सातारा जिल्हा परिषदेमध्ये विविध प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आली होती व आजही सदर योजनांचे पालन करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून आता लसवंत नागरिकांनाच जिल्हा परिषदेत प्रवेश देण्यात येणार आहे.

Advertisements

सद्यपरिस्थितीत कोविड-19 जिल्हा प्रशासनाच्या अविरत प्रयत्नांनी आटोक्यात आला असला तरी भविष्यात त्याचा प्रादुर्भाव जास्त वाढू नदेण्यासाठी लसीकरण हा एकमेव उपाय आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकाऱयांनी दि. 29 ऑक्टांबर पासुन कोविड लसीकरणाच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शक सुचना प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. त्यानुसार आता दोन्ही डोस पूर्ण झालेल्यांनाच जिल्हा परिषदेत प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौण जी सी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांनी दिली आहे.

Related Stories

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

datta jadhav

‘त्या’ छायाचित्राकाराचा शिवभक्तांकडून निषेध

Abhijeet Shinde

सातारा : क्षेत्र माहुली येथे एका युवकाचा खून

Abhijeet Shinde

अखेर जिल्हा कारागृह परिसरातील बांधकाम निर्बंध शिथील

Abhijeet Shinde

सातारा : वणवा लावल्याप्रकरणी पवनचक्की कंपनीवर कारवाई

Abhijeet Shinde

विधानपरिषदेची उमेदवारी साताऱ्याला द्या

Abhijeet Shinde
error: Content is protected !!