तरुण भारत

पंचायत राज समिती दौरा पुढे ढकलला

प्रतिनिधी / ओरोस:

पंचायत राज समितीचा 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत होणारा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे.

Advertisements

जि. प. च्या 2015-16 व 1016-17 चा लेखा परीक्षा पुनर्विलोकन अहवाल आणि 2016-17 आणि 2017-18 चा वार्षिक प्रशासन अहवाल याबाबत जि. प. ची तपासणी करण्यासाठी विधान मंडळाची 32 सदस्यीय आमदार असलेली समिती सिंधुदुर्ग जिल्हा दौऱयावर येणार होती. ही समिती लोकोपयोगी योजनांच्या अंमलबजावणीच्या माहितीबरोबरच मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अन्य संबंधित अधिकाऱयांची साक्ष नेंदविणार होती.

या दौऱयाच्या अनुषंगाने जि. प. प्रशासनाकडून सज्जता सुरू होती. दौऱयाला अवघे पाचच दिवस उरलेले असताना गुरुवारी हा दौरा पुढे ढकलण्यात येत असल्याचे पत्र जि. प. प्रशासनाला प्राप्त झाले आहे. या पत्रात पुढील तारखेचा उल्लेख नसून ती यथावकाश कळविण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान नुकत्याच जाहीर झालेल्या जिल्हय़ातील चार नगरपंचायतींच्या निवडणुका आणि 130 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांच्या आचारसंहितेमुळे हा दौरा पुढे ढकलला गेल्याची चर्चा आहे.

Related Stories

वेंगुर्ले शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्सेनिक गोळ्या संपूर्ण शहरांत वाटपाचा शुभारंभ

NIKHIL_N

जामीन मिळाल्यानंतर राणेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Abhijeet Shinde

एसटी कर्मचाऱयांवर कारवाई पाहता प्रशासनाने सहकार्य ठेवा

Patil_p

जिल्हा बँक पुरस्कारांचे उद्या वितरण

NIKHIL_N

वैभववाडीत एकाच दिवशी 1 हजार 250 शोषखड्डे

NIKHIL_N

वेर्ले गावाचा कोरोना मुक्तीसाठी लढा

Ganeshprasad Gogate
error: Content is protected !!