तरुण भारत

दिल्ली विधानसभेकडून कंगनाला समन्स

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलकांना ‘खालिस्तानी आतंकवादी’ असे संबोधल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना राणावतविरुद्ध अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. तसेच आता दिल्ली विधानसभेतील एका समितीनेही याप्रकरणी चौकशीसाठी पाचारण केले आहे. कंगनाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आले असून आता तिला थेट विधानसभेने समन्स बजावले आहे. आमदार राघव चड्ढा यांच्या नेतृत्वाखाली नियुक्त समितीने कंगनाच्या सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टबाबत 6 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता तिला हजर राहण्यास सांगितले आहे. चड्ढा यांच्या नेतृत्वाखाली शांती आणि सद्भाव विषयक समितीने कंगनाला समितीसमोर हजर राहण्यास सांगितले आहे. कंगनाच्या वक्तव्यामुळे शीख बांधवाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेतल्यानंतर कंगनाने शीख समुदायाला खलिस्तानी आतंकवादी असे संबोधत इन्स्टाग्रामवर वादग्रस्त पोस्ट केली होती.

Related Stories

सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षण रद्द

Patil_p

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी 10 वाजता जनतेशी साधणार संवाद

prashant_c

रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर जैसे थे

prashant_c

धार्मिक आव्हानामुळे बॅनर्जींना नोटीस

Patil_p

1 ते 15 जुलै दरम्यान ‘सीबीएसई’ची परीक्षा

Patil_p

देशद्रोहप्रकरणी शरजील इमामला दिलासा

Patil_p
error: Content is protected !!