तरुण भारत

उत्तर प्रदेशात ‘जम्बो’ एअरपोर्टची पायाभरणी

जगातील चौथ्या क्रमांकाचे मोठे विमानतळ : एकाचवेळी 178 विमानांची सुविधा : ‘आंतरराष्ट्रीय हब’ बनविण्याचे नियोजन

वैशिष्टय़े…

Advertisements
  • ग्रीनफिल्ड विमानतळ चार टप्प्यात बांधणार
  • निर्मितीवर 29,650 कोटी रुपये खर्च होणार
  • पहिला टप्पा 2024 मध्ये कार्यान्वित होणार
  • पहिल्या टप्प्यासाठी 8,916 कोटी रुपये खर्च

नवी दिल्ली, नोएडा / वृत्तसंस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गुरुवारी दुपारी नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाची (जेवार विमानतळ) पायाभरणी करण्यात आली. निर्मितीनंतर हे जगातील चौथ्या क्रमांकाचे मोठे विमानतळ असणार असून येथे एकाच वेळी 178 विमाने उभी राहू शकतील. हे विमानतळ चार द्रुतगती मार्ग, मेट्रो, बुलेट टेन आणि टॅक्सीद्वारे जोडले जाईल. तसेच सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगमध्ये मेट्रो आणि बुलेट टेनचे स्थानक बांधले जाणार असून त्यामध्ये विमानाने प्रवास करणाऱया प्रवाशांसाठी प्रत्येक सुविधेची काळजी घेण्यात आली आहे.

जेवार विमानतळाच्या उभारणीसाठी 29 हजार 650 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. सप्टेंबर 2024 मध्ये येथून पहिले विमान उड्डाण करेल. जेवार विमानतळ 5,845 हेक्टर क्षेत्रावर बांधण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 1,334 हेक्टर जमिनीवर दोन पॅसेंजर टर्मिनल आणि दोन धावपट्टय़ा बांधण्यात येणार आहेत. नंतर येथे एकूण पाच धावपट्टय़ा बांधण्यात येणार आहेत. जेवार विमानतळ दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळापासून 72 किमी आणि नोएडापासून 40 किमी अंतरावर आहे. येथून सुरुवातीला 8 देशांतर्गत उड्डाणे सुरू होणार आहेत. देशांतर्गत उड्डाणांमध्ये 40 टक्के मागणी ही मुंबई, कोलकाता, बेंगळूर, हैदराबाद आणि चेन्नईसारख्या मेट्रो शहरांमध्ये जाणाऱया प्रवाशांकडून सर्वाधिक आहे.

जेवार विमानतळ यमुना इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेडद्वारे विकसित केले जात आहे. यमुना इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड, उत्तर प्रदेश सरकार आणि भारत सरकारच्या जवळच्या भागीदारीत पीपीपी मॉडेल अंतर्गत विमानतळ विकसित केला जात आहे. जेवार विमानतळ त्याच्या संपूर्ण क्षेत्रावर विकसित होईल, तेव्हा ते फ्लोरिडाच्या ओलँडो आंतरराष्ट्रीय विमानतळाला मागे टाकून जगातील चौथ्या क्रमांकाचे विमानतळ असेल. तसेच किमान 2030 पर्यंत हे विमानतळ दिल्लीसारखे आंतरराष्ट्रीय स्वरूप घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

प्रवाशांची वर्दळ वाढणार

पहिल्या वर्षी सुमारे 40 लाख प्रवाशांची वर्दळ होणार आहे. 2025-26 मध्ये प्रवाशांची संख्या 70 लाखांपर्यंत असू शकते. दरवषी ही संख्या दुपटीने वाढण्याची अपेक्षा आहे. 2044 पर्यंत प्रवाशांची संख्या सुमारे 8 कोटीपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे. हवाई वाहतूक आणि प्रवाशांची संख्या जसजशी वाढत जाईल तसतशा धावपट्टय़ा वाढवण्यात येणार आहेत.

Related Stories

पंजाब : 2,490 नवे कोरोना रुग्ण ; 38 मृत्यू

Rohan_P

राजस्थानमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 55 हजार पार

Rohan_P

दुसरी लाट ओसरण्याची चिन्हे

Patil_p

राजस्थान : खाजगी रुग्णालय आणि लॅबमध्ये होणार 2200 रुपयांमध्ये कोरोना टेस्ट

Rohan_P

युपी : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची कोरोनावर मात!

Rohan_P

दिल्लीत कोरोनाचा उद्रेक : सीबीएसई परीक्षा रद्द करा; केजरीवाल यांची मागणी

Rohan_P
error: Content is protected !!