तरुण भारत

चार दिवसांची विशेष‘पालकत्व’

कौटुंबिक संबंध सुरक्षित राखण्यासाठी आसाम सरकारचा अनोखा निर्णय

वृत्तसंस्था /गुवाहाटी

Advertisements

सरकारमधील सर्व मंत्री, सरकारी अधिकारी, नोकरशहा आणि इतर कर्मचारी यांना आपल्या कुटुंबासह काही दिवस व्यतीत करणे अनिवार्य करण्यासाठी आसाम सरकारने एक अनोखी योजना आणली आहे. अशी योजना देशात इतरत्र कोठेही नाही असा दावा करण्यात येत आहे. या योजनेनुसार यंदा नववर्षदिनापासून या सर्वांना चार दिवसांची विशेष भरपगारी रजा देण्यात येणार आहे.

मात्र, या रजेचा उपयोग पाटर्य़ा करण्यासाठी, पर्यटनासाठी किंवा अन्य कोणत्याही मनोरंजनात्मक कार्यक्रमांसाठी करता येणार नाही. तर या विशेष रजेच्या काळात त्यांना आपल्या कुटुंबासोबत आणि आपल्या सासू सासऱयांसह रहावे लागणार आहे. अलिकडच्या काळात कौटुंबिक संबंधांसाठी कामाच्या रेटय़ामुळे वेळ मिळत नाही, अशी अनेक अधिकारी आणि कर्मचाऱयांची तक्रार असते. ही तक्रार दूर करण्यासाठी ही योजना असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

ही योजना केवळ पुढच्या एकाच वर्षासाठी नसून दरवर्षी अशी विशेष सुटी दिली जाणार आहे. या सुटीचा उपयोग कुटुंबासाठी, विशेषतः कुटुंबातील ज्येष्ठ आणि वयोवृद्ध व्यक्तींच्या सहवासात राहण्यासाठी करण्याची अट आहे. आपले वृद्ध आईवडील किंवा सासूसासरे यांच्या सहवासात या काळात रहावे लागणार आहे. बऱयाचदा त्यांच्याकडे दुर्लक्ष केले गेल्याने घरात ताणतणाव निर्माण होतात. बुजुर्ग कुटुंबियांना यामुळे मानसिक त्रासही होतो. तो दूर करण्यासाठी आणि जुनी निवृत्त झालेली पिढी तसेच सध्याची कार्यरत पिढी यांच्यातील दुरावा दूर करणे आणि कुटुंबात सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करणे यासाठी ही योजना आहे.

उपयोग प्रामाणिकपणे करा

या विशेष रजेचा उद्देश लक्षात घेऊन कर्मचारी व अधिकाऱयांनी या सुटीचा उपपोग त्याच उद्देशासाठी प्रामाणिकपणे करावा, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. मुख्यमंत्री हिमांत बिस्व सर्मा यांनी या योजनेची घोषणा गेल्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात भाषण करताना केली होती. आता या योजनेचे प्रत्यक्ष क्रियान्वयन 1 जानेवारीपासून केले जाणार असल्याची घोषणा करण्यात आली.

Related Stories

एअर इंडियाचा व्यवहार संपूर्णपणे देशविरोधी : सुब्रमण्यम स्वामी

prashant_c

विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारचा पुनर्विचार करा

Patil_p

मृत्यूंसंबंधीच्या दाव्याला रोखठोक प्रत्युत्तर

Patil_p

‘100 कोटी डोस’नंतर भाजपकडून मेगा इव्हेंट

Amit Kulkarni

विराप्पा मोईली यांना साहित्य अकादमी पुरस्कार

Patil_p

पाचवीपर्यंत ऑनलाईन शिक्षण रद्द

Patil_p
error: Content is protected !!