तरुण भारत

टीम अबु धाबीचा शेवटच्या चेंडूवर विजय

वृत्तसंस्था /अबु धाबी

येथे सुरू असलेल्या अबु धाबी टी-10 क्रिकेट स्पर्धेतील बुधवारी झालेल्या चुरशीच्या सामन्यात टीम अबु धाबी संघाने शेवटच्या चेंडूवर दिल्ली बुल्स संघाचा 6 गडय़ांनी पराभव केला. या विजयासह अबु धाबी संघाने आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे.

Advertisements

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्ली बुल्स संघाने 10 षटकात 4 बाद 121 धावा जमविल्या. दिल्ली बुल्स संघातील शेफर्डने 11 चेंडूत 4 षटकार आणि तीन चौकारांसह नाबाद 39 धावा फटकाविल्या तर राईटने 25 धावांचे योगदान दिले. अबु धाबी संघातर्फे डॅनी ब्रिग्जने 20 धावांत 2 गडी बाद केले.

प्रत्युत्तरादाखल अबु धाबी संघाने 10 षटकात 4 बाद 124 धावा जमवित हा सामना जिंकला. या सामन्यात शेवटच्या दोन चेंडूवर अबु धाबी संघाला विजयासाठी 10 धावांची जरूरी होती. अबु धाबी संघातील ओव्हरटनने दिल्लीचा कर्णधार डेव्हॉन ब्रेव्होच्या षटकांतील शेवटच्या दोन चेंडूवर उत्तुंग षटकार ठोकून आपल्या संघाला थरारक विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी या संघातील सॉल्टने 20 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 56 धावा झोडपल्या. लिव्हींगस्टोनने 25 धावांचे योगदान दिले. दिल्ली बुल्सतर्फे ड्रेक्सने 12 धावांत 2 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक

दिल्ली बुल्स 10 षटकात 4 बाद 121 (शेफर्ड नाबाद 39, राईट 25, ब्रिग्ज 2-20), अबु धाबीö10 षटकात 4 बाद 124 ( सॉल्ट 56, लिव्हींगस्टोन 25, ड्रेक्स 2-12).

Related Stories

कॅरोलिना मरिनचा ऑलिम्पिक सहभाग अनिश्चित

Patil_p

डी.शरण दुहेरीत उपांत्यपूर्व फरीत

Patil_p

रूट, रिचर्डसन महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू

Patil_p

वेल्स-अल्बेनिया सामना बरोबरीत

Patil_p

पंचांच्या ‘त्या’ निर्णयाचा पंजाबला फटका

Patil_p

महिला क्रिकेटपटू अन्शुला राववर डोपिंगमुळे चार वर्षांची बंदी

Patil_p
error: Content is protected !!