तरुण भारत

लंकेचा विंडीजवर दणदणीत विजय

गॅले कसोटी : दिमुथ करूणारत्ने ‘सामनावीर’, इंबुल्डेनियाचे 46 धावांत  5 बळी, यजमान संघ मालिकेत आघाडीवर

वृत्तसंस्था /गॅले

Advertisements

यजमान लंकेने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली असून बुधवारी खेळाच्या शेवटच्या दिवशी लंकेने पहिल्या कसोटीत विंडीजचा 187 धावांनी दणदणीत पराभव केला. लंकेचा कर्णधार करूणारत्नेला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. विंडीजच्या दुसऱया डावात लंकेच्या इंबुल्डेनियाने 46 धावांत 5 तर रमेश मेंडीसने 64 धावांत 4 गडी बाद केले. आयसीसीच्या कसोटी चॅम्पियन्सशीप अंतर्गत ही मालिका खेळविली जात आहे.

या सामन्यात लंकेने पहिल्या डावात 386 धावा जमविल्यानंतर विंडीजचा पहिला डाव 230 धावांत आटोपला. लंकेने पहिल्या डावात 156 धावांची भक्कम आघाडी मिळविली. त्यानंतर लंकेने आपला दुसरा डाव 4 बाद 191 धावांवर घोषित करून विंडीजला निर्णायक विजयासाठी 348 धावांचे कठीण आव्हान दिले. विंडीजने 6 बाद 52 या धावसंख्येवरून शेवटच्या दिवसाच्या खेळाला प्रारंभ केला आणि त्यांचा दुसरा डाव 79 षटकांत 160 धावांत आटोपला. त्यांच्या शेवटच्या चार गडय़ांनी 108 धावांची भर घातली.

बॉनेरने एकाकी लढत देत 220 चेंडूत 7 चौकारांसह नाबाद 68 तर डिसिल्वाने 129 चेंडूत 5 चौकारांसह 54 धावा जमविल्या. या जोडीने सातव्या गडय़ासाठी 100 धावांची भागिदारी केली. इंबुल्डेनियाने डिसिल्वाला झेलबाद केले. त्यानंतर जयविक्रमाने कॉर्नवॉलला 13 धावांवर बाद केले. इंबुल्डेनियाने वेरीकेन आणि गॅब्रियल यांना बाद करून विंडीजला 160 धावांवर रोखले. उपाहारावेळी विंडीजने 7 बाद 118 धावा जमविल्या होत्या. उपाहारानंतर विंडीजचे तीन फलंदाज झटपट बाद झाले.

संक्षिप्त धावफलक : लंका प. डाव सर्वबाद 386, विंडीज प. डाव सर्वबाद 230, लंका दु.डाव- 4 बाद 191 डाव घोषित, विंडीज दु. डाव 79 षटकात सर्वबाद 160 (बॉनेर 68,  जे. डिसिल्वा 54, कॉर्नवॉल 13, इंबुल्डेनिया 5-46, रमेश मेंडीस 4-64, जयविक्रमा 1-28).

Related Stories

फ्रान्सच्या फुटबॉलपटू डिंबेलीला दुखापत

Patil_p

कोरोना बाधित हॉकीपटूंच्या प्रकृतीत सुधारणा

Patil_p

क्विटोव्हा, सित्सिपस पहिल्याच फेरीत पराभूत

Patil_p

राजाधिराज, टायगर्स, पाटील मळा संघ पुढील फेरीत

Patil_p

टी.लालरिनसांगा डब्ल्यूबीसी युवा वर्ल्ड चॅम्पियन

Patil_p

भारताचे पाच ऍथलेट्स कोरोना पॉझिटिव्ह

Patil_p
error: Content is protected !!